घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत चेंबूर, विक्रोळीतील घटनेत २९ जणांचा मृत्यू

Live Update: मुंबईत चेंबूर, विक्रोळीतील घटनेत २९ जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबईतील चेंबूर, विक्रोळीतील दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. एकूण २९ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी ६ वाजता मुसळधार पावसामुळे मुंबईत उद्भवलेल्या आपत्तीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक


मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्या छातीत दुःखू लागल्यामुळे त्यांना मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत केवळ ३ मिनिटांची उपस्थिती दर्शवली यामुळे विरोधक चांगलेच नाराज झाले आहेत. दिल्लीत संसदीय कार्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनापुर्वी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सर्व विरोधक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार होते परंतु मोदींनी ३ मिनिटांची उपस्थिती लावल्यामुळे विरोधक नाराज झाले आहेत. (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिकर करा)


छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ९ विमानांचा मार्ग बदलला, मुंबईतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई विमानतळाने पुढील सर्व विमानांचे उड्डाण रद्द केलं आहे.


जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये बस बोटीची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. राज्य सरकार लवकरच या बस बोटीला कार्यान्वीत करण्याची शक्यता आहे. या बोटीमध्ये संगीत प्रणाली, एसीसह आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.


देशात २४ तासात ४१ हजार १५७ कोरोनाबाधितांची नोंद, ५१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ४ लाख २२ हजार ६६० कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. आतापर्यंत ४ लाख १३ हजार ६०९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.


माजी गृहमंत्री अनिल देशमुख काटोल आणि वडविहीराल निवासस्थानी ईडीने छापा टाकला असून छापेमारी सुरु आहे. अनिल देशमुखांच्या समर्थकांनी काटोल बंगल्याबाहेर मोठी गर्दी केली असून या छापेमारीचा निषेध केला आहे. (सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा)


पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चेंबूरमधील दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहेत. चेंबूर,वरळी, भांडूपमध्ये घरावर संरक्षण भींत,दरड कोसळल्याने २३ जणांचा मृत्यू झाला असून यापैकी १७ जण हे चेंबूरमध्ये मृत्यू पावले आहेत. घटनास्थळी बचावकार्य वेगाने करण्यात येत आहे. (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा )


मुंबई लोकल हळूहळू पुर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. हार्बर लाईन पुर्ववत करण्यात आली असून मध्य व पश्चिम लोकल हळूहळू धावत असून लवकरच पुर्ववत करण्यात येईल


मुंबईतील घरांवर संरक्षण भींत कोसळल्याने आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू तर १९ गंभीर जखमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत वाहिली मुंबईतील दुर्घटनेत झालेल्या मृतांसाठी श्रद्धांजली, कुटुंबीयांच्या दुःखात सामील असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक, शिवसेना मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करणार (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)


मुंबईसह उपनगरात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दैना उडाली आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणा झाला आहे. यामुळे मुंबईची लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे. सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या असून कल्याण-मुंबई लोकल सेवाही ठप्प झाली आहे.. पुढील काही तासात मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं आयएमडी मुंबईने काल रात्री साडे बारा वाजता जाहीर केलं होतं. तर सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.


मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या मुसळधार पावसामुळे चेबूर आणि विक्रोळीत घरांवर संरक्षण भिंत कोसळून तब्बल १४ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडल्याची माहिती समोर आली आहे, अद्याप या ठिकाणी एनडीआरएफकडून युद्धपातळीवर अडललेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मलबा हटवला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -