घरताज्या घडामोडीLive Update: शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी केलं अटक

Live Update: शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी केलं अटक

Subscribe

उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अश्लील सिनेमा करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.


मुंबईत गेल्या २४ तासात ४०२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर मागील २४ तासात ५७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. (सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा)

- Advertisement -

Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत मोठी घट, २४ तासात ६ हजार कोरोना रुग्णांची नोंद


Maharashtra FYJC CET 2021 अकरावी परीक्षेच्या CET ची तारीख जाहीर, 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान अकरावी सीईटी परीक्षा राज्यभरात घेतली जाणार (सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा )

- Advertisement -

ठाण्यात मुसळधार पाऊस पडत आहे. कळव्याला दरड कोसळल्याने ५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य वेगानं करण्यात येत आहे.


मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या वडीलांचे निधन


केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची राज्यसभा उपनेता पदी नियुक्ती


मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा जावई गिरीश चौधरी याचा ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. उद्यापर्यंत ईडी कोठडी गिरीश चौधरीला सुनावण्यात आली आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या ‘पे अँड पार्क’मध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचलं आहे. अनेक वाहनं पाण्याखाली गेली आहेत. अंदाजानुसार पार्किंगमधील ४०० वाहनं पाण्याखाली बुडाल्याची भीती आहे.


मुख्यमंत्री आज, सोमवार १९ जुलै रोजी दुपारी दोननंतर वाहनाने पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. उद्या, मंगळवार २० जुलै रोजी पहाटे सव्वा दोन वाजता मुख्यमंत्री सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा करतील.


विक्रोळी-कांजूरमार्ग विभागात मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली आहे. मुख्य मार्गावरील गाड्या ठाणे-कल्याण, कल्याण-कर्जत-खोपोली, कसारा, ट्रेव धावत आहे. तसेच हार्बर लाइन, ट्रान्स-हार्बर लाइन, बेलापूर / नेरूळ-खारकोपर मार्गावर गाड्या धावत आहेत. १५ ते २० मिनिटं लोकल उशिराने धावत आहेत.


कोकण रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळल्यामुळे अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. पहाटे ४ वाजल्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.


कसारा येथे रेल्वे रुळावर झाडे आणि चिखल जमा झाले.


नवी मुंबईत मुसळधार पाऊस आहे. महापे पुलाजवळ पाणी साचलं असून यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.


गेल्या २४ तासांत ३८ हजार १६४ नवे कोरोनाबाधित आढळले असून ४९९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३८ हजार ६६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ११ लाख ४४ हजार २२९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख १४ हजार १०८ जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी ३ लाख ८ हजार ४५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ४ लाख २१ हजार ६६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशात ४० कोटी ६४ लाख ८१ हजार ४९३ जणांचे लसीकरण पार पडले आहे.


आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे.


कोरोनामुळे यंदाही पालख्या एसटीने पंढरपूरकडे रवाना होत आहेत. मानाच्या पालख्यांसोबत प्रत्येकी ४० वारकऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. संत मुक्ताई पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं आहे. पहाटे ४ वाजता पालखी पंढरपूरकडे एसटीने रवाना झाली होती.


मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावर आणि हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम झाला होता. मात्र आता दोन्ही मार्गावर लोकल सेवा पूर्ववत झाली आहे.

मुंबईतल्या मुसळधार पावसामुळे दोन रेल्वे धावणार नाही आहेत. एक म्हणजे नाशिकहून मुंबईला जाणारी पंचवटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर दुसरी नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे.


जगातील कोरोनाबाधितांची संख्या काही कमी होताना दिसत नाही आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या १९ कोटी ११ लाख ९७ हजारांवर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४१ लाख ५ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १७ कोटी ४१ लाख ५१ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -