घरताज्या घडामोडीLive Update: Mumbai corona Update : मुंबईकरांना दिलासा, गेल्या २४ तासात ४३५...

Live Update: Mumbai corona Update : मुंबईकरांना दिलासा, गेल्या २४ तासात ४३५ कोरोनाबाधितांची नोंद

Subscribe

Mumbai corona Update : मुंबईकरांना दिलासा, गेल्या २४ तासात ४३५ कोरोनाबाधितांची नोंद


राज्यात ८ हजार १५९ कोरोनाबाधितांची नोंद तर १६५ कोरोना रुग्णांचा मृत्यू

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चेंबूरमधील रहिवाशांच्या भेटीला गेले असून पटोले यांनी रहिवाशांची विचारपूस केली


DRDO ने केली AKash Missile ची यशस्वी चाचणी, वायु सेनेच्या ताकदीमध्ये वाढ

- Advertisement -

#WATCH | Defence Research & Development Organisation (DRDO) successfully flight tested indigenously developed low weight, fire & forget Man-Portable Anti-Tank Guided Missile (MPATGM) today pic.twitter.com/Rqujm2N8MO

— ANI (@ANI) July 21, 2021


मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात आज दुपारी ४ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुणे दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. शेकरू प्रजनन केंद्र, रानमांजर केंद्राचे उद्घाटन झाले आहे. कात्रजच्या राजीव गांधी संग्रहालयात उद्घाटन झाले आहे.


देशात गेल्या २४ तासांत ४२ हजार १५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ३ हजार ९९८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ३६ हजार ९७७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


कोल्हापूर जिल्ह्यातील १७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर गेले आहे. शहरात पावसाचा जोर कमी असून ग्रामीण भागात संततधार सुरू आहे.


नवी मुंबई आणि ठाण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईत यलो अलर्ट दिला गेला आहे. मध्यम ते तीव्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. सध्या मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे.


सलग दुसऱ्या वर्षी बकरी-ईद कोरोनाच्या सावटाखाली साजरी केली जातेय. कोरोनामुळे यंदाही देशभरात बकरी-ईद साधेपणाने साजरी केली जातेय. बकरी-ईदच्या निमित्ताने बीएमसीने नियमावली जारी केली असून मैदानावरील सामूहिक नमाज पठनावर बंदी घालण्यात आली आहे.


मुंबई, ठाणे आणि मिरा भाईंदर या ठिकाणी शासकीय आणि पालिकेच्या केंद्रावर लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी कोरोना लसीकरण आज बंद असणार आहे.


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी असे ट्विट केले की, सर्व देशवासियांना ईद मुबारक! ईद-उज-जुहा हे प्रेम, त्याग आणि बलिदान या भावनेचा आदर करण्याचा आणि सर्वसमावेशक समाजात ऐक्य आणि बंधुतेसाठी एकत्र मिळून काम करण्याचा सण आहे. कोरोना बचावाचे नियम अवलंबून समजातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी काम करण्याचे वचन घेऊया.


वर्ल्डोमीटरच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १९ कोटी २२ लाख २३ हजारांहून अधिक झाली आहे. यापैकी आतापर्यंत ४१ लाख ३३ हजारांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले असून १७ कोटी ४९ लाख २१ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -