Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Live Update: मुख्यमंत्री ठाकरे यांची पंतप्रधान मोदींसोबत फोनद्वारे चर्चा

Live Update: मुख्यमंत्री ठाकरे यांची पंतप्रधान मोदींसोबत फोनद्वारे चर्चा

Related Story

- Advertisement -

राज्यातील पूरपरिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा झाली अशी माहिती मिळाली आहे.


मुंबईत मागील २४ तासात ३९२ कोरोनाबाधितांची नोंद, १० रुग्णांचा मृत्यू


- Advertisement -

राज्यात मागील २४ तासात ७ हजार ३०१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ७ हार ७५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज १२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


कोकणातील नागरिकांना केंद्र सरकार मदत करणार – नारायण राणे (सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा)


- Advertisement -

कोकणाती चिपळूण,महाड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग भागातील विज पुरवठा खंडित, अनेक गावे अद्यापही पाण्याखाली


माथेरान, सातारा, महाबळेश्वर, पुणे, रायगड जिल्ह्यांत पुढील ३ ते ४ तास मुसळधार पावसाची शक्यता


एनडीआरएफचं पथक चिपळूमध्ये दाखल, वेगाने बचावकार्याला सुरुवात


कल्याणमध्ये एनडीआरएफ पथकाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.


चिपळूणमध्ये मुसळधार पावासामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने बचावकार्य करण्यासाठी २ हेलिकॉप्टर चिपळूणच्या दिशेने रवाना करण्यात आले आहेत.


अनिल देशमुख यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील पूरपरीस्थितीचा घेतला आढावा. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी कोकण विभागीय आयुक्त, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री उदय सामंत आणि रायगड जिल्ह्याचे पालक मंत्री आदीची तटकरे यांच्याशी केली चर्चा. तात्काळ आपतकालीन विभागाकडून सर्व मदत पोहचवण्याचे दिले आदेश. पूराने वेढलेल्या गावातील आणि शहरांतील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी हेलिकाँप्टरचीही मदत घेण्याचे आदेश. पूरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढन्यासाठी अतीरीक्त बोटी तात्काळ पोहवण्याचेही आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांना दिले आहेत.


शहापूर तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी आल्याणी (पष्टेपाडा) गावात शिरले पाणी गावातील लोकांना केले सुरक्षित स्थळी स्थलांतरीत


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पूर परीस्थितीचा आढावा घेतला आहे. ठाणे आणि पालघर जिल्हाधिकारी तसेच ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे, पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून तात्काळ लागेल ती सर्व मदत पोहचवण्याचे आदेश दिलेत. भिवंडी, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कर्जत, कसारा, खोपोली येथील पूरपरीस्थितीची माहीती घेतली. पूरात अडकेलेल्या नागरिकांना सूखरूप बाहेर काढण्यासाठी लागेल ती सर्व मदत करा आवश्यकता भासल्यास हेलिकाँप्टरचीही मदत घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश.


भातसा नदीवरील सापगाव पुल खचला शहापूर मुरबाड तालुक्यातील १५० गाव पाड्यांचा संपर्क तुटला, प्रशासनाने सतर्कता दाखवत तातडीने वाहतूक केली बंद


एकाच दिवसात मोडक सागर, तानसा तलाव ओव्हरफ्लो

गेल्या २४ तासात पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील पवई, तुळशी, विहार आणि मुंबई बाहेरील मोडकसागर, तानसा तलाव ओव्हरफ्लो झाले आहे. या सात तलावांत एकूण ७ लाख ७९ हजार ५६८ दशलक्ष लिटर (५३.८६%) पाणीसाठा जमा झाला असून मुंबईकरांसाठी ही आनंदवार्ता असणार आहे.


बदलापुरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली. धोक्याची पातळी १७.५० मीटर असून आता या नदीची पाणी पातळी १७.८० मीटर झाली आहे. बदलापूरातील सखल भाग पाण्यात गेला असून रेल्वे ट्रकवर साचले आहे


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील आरोपांमध्ये वाढ होत आहे. त्यांच्यावर आता खंडणी गोळा करणे आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. एवढंच नव्हे तर परमबीर सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. बांधकाम व्यवसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गेल्या २४ तासात भारतात ४१ हजार ३८३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५०७ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात ३८ हजार ६५२ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी १२ लाख ५७ हजार ७२० वर गेला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी ४ लाख २९ हजार ३३९ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४  लाख १८ हजार ९८७ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले


मुंबईतही आजही लसीकरण बंद ठेवलं जात आहे. मंगळवार दिनांक २० जुलै रोजी पुरेशा लससाठ्या अभावी मुंबईतील काही लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती. तर बुधवारी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर कोरोना लसीकरण बंद होतं. अशातच आजही मुंबईत कोरोना लसीकरण बंद असणार आहे. आज लसीकरण बंद असल्यासंदर्भातील माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन ट्वीटही करण्यात आले आहे.


शेतकरी संघटनांच्या वतीनं आज दिल्लीत जंतर-मंतरवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, ‘शेतकरी संसद’ आयोजित करण्यात येणार आहे. आजपासून दररोज सिंघू सीमेवरुन २०० आंदोलक शेतकरी जंतर-मंतरवर दाखल होतील. यापूर्वी दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत एका शेतकरी नेत्यानं म्हटलं की, “शेतकरी नवे कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करणार आहेत

- Advertisement -