Live Update: सातारा जिल्ह्यातील ७५५ नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

gyanvapi Mosque Raj Thackeray Ayodhya Maharashtra Monsoon OBC Reservation Ketaki Chitale
gyanvapi Mosque Raj Thackeray Ayodhya Maharashtra Monsoon OBC Reservation Ketaki Chitale

सातारा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या लोकांचे पूराचा संभाव्य धोका ओळखून एकूण 189 कुटुंबातील 755 जणांना त्यांच्या गावातील जवळच्या नातेवाईकांकडे तसेच नगरपालिका शाळा या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलेले आहे.


राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ७५३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद ( सविस्तर वाचा )


मुंबईत मागील २४ तासात ३७४ कोरोनाबाधितांची नोंद (सविस्तर वाचा)

२४ तासात बाधित रुग्ण – ३७४ २४ तासात बरे झालेले रुग्ण – ५८२ बरे झालेले एकूण रुग्ण – ७०९१९८ बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७% एकूण सक्रिय रुग्ण- ५७७९ दुप्पटीचा दर- १२०९ दिवस कोविड वाढीचा दर (१६ जुलै ते २२ जुलै)- ०.०५%


सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंतचा पाऊस Mahabaleshwar, Satara 180.2 mm Shivaji Nagar Pune 77.2 mm Kolhapur 135.3 mm – IMD


खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग, धरणातून २४ हजार ०५६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग


भारतीय हवामान खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या बातमी पत्रानुसार रत्नागिरी जिल्ह्यासाठी २४ जुलै पर्यंत रेड अलर्ट. मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता.


मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर या परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या ३० जुलै पासून सुरु होत असलेल्या १६ परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.


महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे मृत्यु पावलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपये सानुग्रह मदत तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा


राष्ट्रपती कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन राज्यातील दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील असल्याचं मोदींचं ट्विट


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची फोनद्वारे चर्चा, राज्यातील पूरस्थितीवर घेतली माहिती


पोलादपूर केवनाळे, गोवेले सुतारवाडीत भूस्खलन, ढिगाऱ्याखाली दबून ११ जणांचा मृत्यू


चिपळूमधील कोविड सेंटरमध्ये ८ जणांचा मृत्यू


शालेय अभ्यासक्रमात पंचवीस टक्के कपात, शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांची घोषणा

शालेय अभ्यासक्रमात २५नटक्के कपात करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून जाहीर


कोयना नदीतून एकूण ४४ हजार ६२० क्यूसेक पाण्याचा विसर्ग


कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून केल्या जात असलेल्या विसर्गाचा वेग आणखी वाढवला आहे. सांगली आणि कोल्हापूरच्या पूर परिस्थितीबाबत काहीसा दिलासा मिळाला आहे. कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून केल्या जात असलेल्या विसर्गाचा वेग आणखी वाढवण्यात आला आहे. अलमट्टी धरणातून सकाळी ८ वाजेपर्यंत १ लाख १७ हजार ४२८ क्यूसेक गतीने पाण्याचा विसर्ग सुरू


तळीये दुर्घटनेत दोन मुले जखमी अवस्थेत सापडली आहेत. त्यात एक मुलगी असून तिला माणगावमधील रुग्णालयात दाखल केले आहे. तर स्वप्नील कोंडाळकर या दुसऱ्या तरुणाला उपचारासाठी मुंबईमध्ये आणण्यात येत आहे.


कोल्हापूरातील पूरपरिस्थितीतील पाण्यात सातत्याने वाढ


सातारा जिल्ह्यातील कोंडावळे या गावात जवळपास पंचवीस घरं गाडली गेली आहेत. यामुळे अनेक लोकं या मोठ्या दुर्घटनेतून वाचली. या दुर्घटनेत जवळपास २५ घरं गाडली गेली तर २७ लोक बाहेर काढली. मात्र अद्यापही दोन जण यामध्ये अडकलेले


रायगड – महाड एम आय डी सी तील कारखान्यात रात्रीच्या सुमारास स्फोट

महाड येथील ऑरगॅनिक कारखान्यात आग लागल्याचे समोर आले आहे. आज पहाटे पुन्हा आणखी एका कंपनीत ही आग लागली. एम आय डी सी चे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल


भातसा धरण पुर्ण क्षमतेने भरण्याची पाण्याची पातळी 142.07 मीटर इतकी आहे सध्या धरणाची पाण्याची पातळी ही 128.75 मीटर इतकी आहे.अजूनही पाणी पातळी 14 मीटरने कमी आहे.


चेंबूर, भांडुप, विक्रोळी येथे दरड, भिंत, घर कोसळून ३० जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी ४.३० वाजताच्या सुमारास गोवंडी येथे तीन मजली इमारतवजा घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जण जखमी झाले. त्यापैकी गंभीर जखमी मोकर शबीर शेख (८०) व नेहा परवेझ शेख (३५/ महिला), शमशाद शेख (४५/महिला) तिघांचा मृत्यू झाला. तर ७ जखमींवर सायन, राजावाडी या रुग्णालयात उपचार सुरू


सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी 3 एनडीआरएफ टीम तैनात केल्या आहेत 1 टीम पुण्याहून आणि 2 टीम ओरिसा येथून दुपारी गोवा विमानतळावर दाखल होत आहेत.


कोल्हापूरात मुसळधार पाऊस असून नेसरी पोलीस ठाणे हद्दीतील शिपुर, हदलगे, तलेवाडी, बिद्रेवादी, कुमारी रोडवर पाणी आलेने वाहतूक बंद


कोकणात मुसळधार पाऊस असून नागरिकांना सुखरूप वाचवण्यासाठी एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी पाणी साठल्याने कित्येक घरं पाण्यात गेली आहे.


गेल्या २४ तासात भारतात ३५ हजार ३४२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४८७ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात ३८ हजार ७४० जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.


खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असून डेक्कन आणि पुण्यातील पेठांना जोडणारा भिडे पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.


सातारा येथील कोयना धरणामधून आज सकाळी ८ वाजता एकूण ११६६७ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.


कोल्हापुरात पावसाचा जोर कायम असून पंचगंगा नदीने गुरुवारी रात्री धोक्याची पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावातील रहिवाशांचे स्थलांतर करण्यास सुरुवात झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ४६ फूट इंचांवर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ११० हून अधिक बंधारे पाण्याखाली


महाडमध्ये दरड कोसळली

महाडमध्ये दरड कोसळून ३० घरे मातीखाली दबल्याची माहिती मिळत आहे. महाड तालुक्यातील बिरवाडीपासून १४ किमी अतंरावर ही घटना घडली आहे. या घटनेत ३० घरे जमिनी खाली गेल्यामुळे यामध्ये एकूण ७२ नागरिक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी इशारा पातळीजवळ पोहोचली असून सध्या आयर्विन पुलावर पाणी पातळी ३८ फुटांच्यावर


बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा