Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Live Update: मुंबईत गेल्या २४ तासात ४४६ कोरोनाबाधितांची नोंद

Live Update: मुंबईत गेल्या २४ तासात ४४६ कोरोनाबाधितांची नोंद

Related Story

- Advertisement -

Mumbai Corona Update मुंबईत गेल्या २४ तासात ४४६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिकर करा)


Maharashtra Corona Update: १३ हजार ४५२ रुग्णांची कोरोनावर मात; ७७६१ नवे रुग्ण (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिकर करा)


- Advertisement -

राज्यमंत्रिमंडळात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कामगारीच्या आधारावर २ मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. (सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा)


जळगावमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

- Advertisement -


कोरोना दुसऱ्या लाटेमध्ये लसीच्या एक डोसमध्ये ८२ टक्के मृत्यूचे प्रमाण कमी करण्याची सक्षमात आहे. तर दोन डोस कोरोना मृत्यू रोखण्यासाठी ९५ टक्के यशस्वी आहे, अशी माहिती नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिली.


अर्ध्या तासात दहावीच्या निकालाची वेबसाईट सुरू होणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील म्हणाले.


ऊर्जामंत्री नितीन राऊतांना मुंबई हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे. चार्टर्ड विमान वापराबाबत नोटीस पाठवण्यात आली आहे.


राज्याची माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. देशमुखांची ४ कोटी २० लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.


भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. ईपीएफची रक्क जमा न केल्यामुळे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे. विनापरवान ऊस गाळप केल्याने पनगेश्वर साखर कारखान्याला तीन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.


राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्या सुरेखा सिकरी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे समोर आले आहे. ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.


देशात गेल्या २४ तासांत ३८ हजार ९४९ नव्या रुग्णांची वाढ ५४२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर ४० हजार २६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या ६ राज्यांमध्ये दुसऱ्या लाटेच्या दरम्यान सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव होता. अजून येथे कोरोनाचे आकडे स्थिर आहेत, मात्र कमी होत नाही आहेत. त्यामुळे आज सकाळी ११ वाजता मोदी यांची ६ राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक होणार आहे.


काल रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मिठी नदीशेजारीला असलेल्या क्रांतीनगर परिसरातील रहिवाशांचे स्थलांतर करण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये या रहिवशांचे स्थलांतर करून तात्पुरता आसरा दिला जात आहे.


मुसळधार पाऊस आणि सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे बसेसचे मार्ग बदलण्यात आल्या आहेत.


मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सायन आणि कुर्ला स्टेशन दरम्यान पाणी साचलं आहे. यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधील अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.


मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे आज सकाळी सकाळी मुंबईतील अनेक ठिकाणच्या सखल भागत पाणी साचलं आहे. हिंदमाता, सायन, वडाळा, दादर, वरळी या भागात पाणी साचलं आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करत मूल्यमापन पद्धतीने निकाल जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नऊ विभागीय मंडळांचा दहावीचा निकाल १६ जुलैला दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.

- Advertisement -