घरताज्या घडामोडीLive Update: आतरराष्ट्रीय प्रवशांना राज्य सरकारचा दिलासा, दोन लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना...

Live Update: आतरराष्ट्रीय प्रवशांना राज्य सरकारचा दिलासा, दोन लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना मिळणार सूट

Subscribe

आतरराष्ट्रीय प्रवशांना राज्य सरकारचा दिलासा, दोन लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना मिळणार सूट


Maharashtra Corona Update: नव्या बाधितांच्या संख्येत किंचित घट; १७० बाधितांचा मृत्यू (सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा)

- Advertisement -

Mumbai Corona Update : मुंबईत सक्रिय कोरोना रुग्णसंख्येत घट, २४ तासात ५४५ कोरोनाबाधितांची नोंद (सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा)


नवे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट

- Advertisement -

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांच्या भेटीला गेले असून गेल्या अर्धा तासापासून चर्चा सुरु होती. अखेर ही बैठक संपली आहे. (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)


मनसे अध्यक्ष राज ठाकरे ३ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर, राज ठाकरे यांचा नाशिक दौरा शुक्रवारी सुरु होईल. महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा दौरा असल्याचे सांगितले जात आहे.


राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी थोड्या वेळात दाखल होतील.


डोंबिवली स्टेशन जवळील लक्ष्मी निवास इमारतीला भीषण आग लागली आहे. आगीच नेमके कारण काय आहे? हे अद्याप माहित नाही. पण सर्व रहिवाशांना सुखरूप बाहेर काढल्याचे समोर आले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा जावई गिरीश चौधरीला मनी लाँड्रिंग प्रकरणात १९ जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.


दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार


कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव कोल्हापूर जिल्ह्यात आहे. त्यामुळे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापुरात केंद्रीय पथक दाखल झाले आहे. यावेळी केंद्रीय पथक कोल्हापुराच्या आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन कोरोनाचा आढावा घेईल. या बैठकीनंतर कोल्हापुरातील काही रुग्णालयांना केंद्रीय पथक भेट देण्याची शक्यता आहे.


मुंबईतील वरळी, नायगाव आणि डिलाईरोडमधील पोलीस वसाहतीचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. पुनर्विकासात पोलिसांना हक्काची घरं देण्याबाबत आज तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, सतेज पाटिल उपस्थित राहणार आहेत.


मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. फडणवीसांच्या निवासस्थानी भुजबळाची भेट झाली असून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीसांशी चर्चा झाली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीला भेट देऊन बनारस हिंदू विद्यापीठात मातृ आणि बाल आरोग्य युनिटचे उद्घाटन करणात आहे. सध्या लोक कार्यक्रमाच्या स्थळी येऊ लागले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.


गेल्या २४ तासांत ४१ हजार ८०६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ५८१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३९ हजार १३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सविस्तर वाचा 


आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, देशात १४ जुलैपर्यंत ४३ कोटी ८० लाख ११ हजार ९५८ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या असून यापैकी काल दिवसभरात १९ लाख ४३ हजार ४८८ नमुन्यांच्या चाचण्या केल्या आहेत.


इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघावर कोरोनाचं सावट असल्याचे समोर आले आहे. कारण कसोटीपूर्वी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत एक भारतीय खेळाडूला कोरोनाची बाधा झाली आहे. पण कोरोनाबाधित त्या भारतीय खेळाडूचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.


गेल्या ३ दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील अनेक नद्यांना पूर आला आहे. सिंधुदुर्गमधील निर्मला नदीला पूर आल्यामुळे २७ गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा वेढा झाला असून घराघरात पाणी शिरलं आहे. पुढील ३ दिवस सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नीला काल, बुधवारी ईडीचा समन्स बजावण्यात आला असून आज सकाळी ११ वाजता ईडीकडून त्यांची चौकशी होणार आहे.


सध्या जगभरात कोरोनाची वेगवेगळी रुप आढळत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील एकूण कोरोाबाधितांची संख्या १८ कोटी ९१ लाख ३८ हजार पार झाली आहे. यापैकी आतापर्यंत ४० लाख ७४ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १७ कोटी २७ लाख ७६ हजारांहून कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -