Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: जयंत पाटील यांची अँजिओग्राफी केली जाणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती

Live Update: जयंत पाटील यांची अँजिओग्राफी केली जाणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती

Related Story

- Advertisement -

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर नसल्याने ते मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून रुग्णालयाकडे रवाना झाले होते. दरम्यान, जयंत पाटील यांची प्रकृती स्थित असल्याची माहिती यांनी दिली असून उद्या त्यांची अँजिओग्राफी केली जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


राज्यात ६ हजार ८५७ नव्या रुग्णांची वाढ झाली असून २५६ मृत्यूची नोंद झाली आहे. तर ६ हजार १०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.


- Advertisement -

खासगी शाळांच्या १५ टक्के फी कपातीचा अध्यादेश येणार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड


महाडमध्ये NDRF चा बेस कॅम्प घ्यावा- पालकमंत्री आदिती तटकरे


- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील रुग्णालयात दाखल, प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती, मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात गेले आहेत.


राज्यातील १४ जिल्ह्यांतील लॉकडाऊन नियम शिथिल होण्याची शक्यता, आरोग्य मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचे सादर केला अहवाल


रिझर्व्ह बॅंकेने अनेक बँकांवर निर्बंध लादल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागला . मात्र आता या लोकांसाठी डिपॉझिट इंश्यूरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन तयार करण्यात आले आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यामुळे ठेवीदारांना ९० दिवसांत पाच लाख रुपये मिळणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.


आंबेघर पूरग्रस्तांशी फडणवीस,दरेकरांना साधला संवाद


पोर्नोग्राफी प्रकरणातील राज कुंद्रा यांची जामीन याचिका कोर्टाने फेटाळली


कोयना धरणाचा पाणीसाठा ९०.८८ टीएमसी इतका झाला आहे. तर कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता ही १०५ टीएमसी इतकी आहे. सध्या कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाला असून धरणात २७१८६ कयुसेक पाण्याची आवक सुरू आहे.


मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक, त्यांची मुलं विहंग आणि पुर्वेश आणि नातेवाईक योगेश चांदेगाला यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला तात्पुरता दिलासा २३ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड प्रकरणी सरनाईक कुटुंबियांनी दाखल केलेल्या याचिकेवर ईडीशी संबंधित टॉप्स सिक्युरिटीज प्रकरणासोबत सुनावणी घेण्याचं कोर्टानं मान्य केलं आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे निर्देश यापूर्वीच कोर्टानं दिलेले आहेत. या याचिकेवर आता २३ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी पार पडणार


बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली


देशात गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे. बुधवारी ४३ हजार ६५४ नव्या रूग्णांचे निदान करण्यात आले तर, ६४० जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. दिलासादायक म्हणजे ४१ हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केली आहे.


अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू आणि १९६० च्या दशकातील भारतीय क्रीडा क्षेत्राचे हीरो असलेले नंदू नाटेकर यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते. पुण्यात वृद्धफकाळानं त्यांचं निधन झालं.


भाजप नेते बसवराज बोम्मई आज सकाळी ११ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि इतर ५ पोलीस अधिकाऱ्यांवर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून एसआयटीची नेमणूक करण्यात आली आहे.


कंगना रणौतला अंधेरी दंडाधिकारी कोर्टात १ सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यासाठी हे समन्स जारी करण्यात आलं आहे. कंगना जर या सुनावणीसाठी गैरहजर राहीली तर तिच्याविरोधात अटक वॉरंटही जारी होण्याची शक्यता.


राज ठाकरे 3 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. ४२ प्रभागांतील शाखाध्यक्षांच्या घेणार बैठक. यावेळी राज ठाकरे शाखाध्यक्षांशी वैयक्तिक बोलणार असून मनसेच्या नव्या कार्यालयात संवाद साधणार


मुंबईत मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अंधेरी पश्चिममध्ये जुहू गल्ली परिसरात अमर सोसायटीमध्ये एका ४ मजल्याच्या घराचं बांधकाम सुरु असताना ते बांधकाम समोरच्या ३ घरांवर कोसळले. या घरांच्या ढिगाऱ्याखाली ५ लोकं अडकलेली होते. ज्यांना मुंबई अग्निशमन दलाचा जवानाने घटनास्थळावर धाव घेऊन तीन ते चार तासांमध्ये रेस्क्यू केल्याचे सांगितले जातेय. या ५ जखमींना जवळच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

- Advertisement -