घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत ९२५ नव्या रुग्णांची नोंद

Live Update: मुंबईत ९२५ नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासात ९२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत आज १ हजार ६३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३१ जणांनी आज कोरोनामुळे जीव गमावला आहे.

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासात १५ हजार १६९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे राज्यात आज २९ हजार २७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

- Advertisement -

विद्यार्थ्यांचे हित जपणे ही आमची भूमिका – वर्षा गायकवाड


बारावीच्या परीक्ष रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापनाकडे प्रस्ताव पाठवणार, प्रस्तावानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड


बारावीच्या परीक्षांचा निर्णय उद्या होण्याची शक्यता


ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी २० वसतिगृहांसाठी १५ कोटी रुपये मंजूर – धनंजय मुंडे


ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी वसतिगृह योजना – मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय


कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांना ५ लाखांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. मंत्रिमंडळच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. राज्यात ५१७२ मुले कोरोनामुळे अनाथ झाली आहेत.


सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला


विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर एकनाथ खडे यांनी देखील पवारांची भेट घेतली आहे.


बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात अजूनही एनसीबीचं धाड सत्र सुरू आहे. ड्रग्ज पेडलर हरीश खानला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला जे ड्रग्ज दिले जात होते ते ड्रग्ज हरीश खान यांच्याकडून आणले जात होते, अशी सुत्राकडून माहिती मिळाली आहे.


विजांच्या कडकडात आणि जोरदार वाऱ्यासह आज मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता


सेन्सेक्स २९८ अंकांनी घसरला आहे. सध्या ५१,६३५.८९वर आला आहे. तर निफ्टी १५,५०६.३०वर आली आहे.


गेल्या २४ तासांत देशात १ लाख ३२ हजार ७८८ नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३ हजार २०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ३१ हजार ४५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सविस्तर वाचा 


भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)ने दिलेल्या माहितीनुसार, देशात १ जूनर्यंत ३५ कोटी ५७ हजार ३३० नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात २० लाख १९ हजार ७७३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत.


राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये बारावीच्या परीक्षांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच मराठा आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण, ओबीसी आरक्षणावरही बैठकीच चर्चा होऊ शकते.


वसई-विरारमध्ये जरी लॉकडाऊन वाढला असला तरी व्यापाऱ्यांना यामध्ये दिलासा मिळाला आहे. आजपासून सर्व अत्यावश्यक वस्तूंची दुकान ७ ते २ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं सोमवार ते शुक्रवारी सकाळी ७ ते २ पर्यंत सुरू राहतील आणि शनिवार व रविवारी दोन दिवस बंद राहतील.


जगात अजूनही कोरोना व्हायरस कहर कायम आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगात आतापर्यंत १७ कोटी १९ लाख ८ हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ३५ लाख ७५ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १५ कोटी ४३ लाख ९९ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -