घरCORONA UPDATECoronaVirus: भारताने कोरोनाबाधितांच्या आकड्यात चीनसह 'या' देशाला टाकले मागे!

CoronaVirus: भारताने कोरोनाबाधितांच्या आकड्यात चीनसह ‘या’ देशाला टाकले मागे!

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. जगभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात भारताने चीनसह पेरू या देशालाही मागे टाकले आहेत. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live या अधिकृत वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८५ हजार ९४०वर पोहोचला आहे. तर पेरू या देशाचा कोरोबाधितांचा आकडा ८४ हजार ४९५ आणि चीनचा ८२ हजार ९४१ आहे. कोरोनाच्या या यादीत भारत अकराव्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा २९ हजार १००वर पोहोचला आहे. यापैकी १ हजार ६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे ६ हजार ५६४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोना विषाणू जरी धीम्या गतीने पसरत असला तरीही आकडेवारी चिंता वाढविणारी आहे.

जगात अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. तसंच कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचे बळी अमेरिकेतच गेले आहेत. त्यानंतर अमेरिकेच्या पाठोपाठ ब्रिटन आणि इटलीमध्ये मृतांचा आकडा सर्वाधिक आहे. अमेरिकेत १४ लाख ८४ हजार २८४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी ८८ हजार ५०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ब्रिटनमध्ये ३३ हजार ९९८ आणि इटलीमध्ये ३१ ६१० जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाच्या संकटात भारतात पाच लाखांहून अधिक सर्जरी होऊ शकतात रद्द


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -