घरताज्या घडामोडीCovid-19 Second Wave: 'ही' दहा कारणे देत आहेत कोरोनाची दुसरी लाट थोपवण्याचे...

Covid-19 Second Wave: ‘ही’ दहा कारणे देत आहेत कोरोनाची दुसरी लाट थोपवण्याचे संकेत

Subscribe

कोरोना दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. यामुळे अनेक राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लावले आहेत. याचा असर आता होताना दिसत आहे. केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगढ, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि तेलंगणासह १८ राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाचे दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. त्यामुळे कुठेतरी कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. तर आज आपण जाणून घेऊयात कोणती १० कारणे कोरोनाची दुसरी लाट थोपवण्याचे संकेत देत आहेत.

१) ६१ दिवसांत पहिल्यांदाच कोरोनामुक्त रुग्णांची संख्या नव्या बाधितांपेक्षा अधिक

देशात २४ तासांत सक्रिय रुग्णांची संख्या ३० हजार १६ने कमी झाली आहे. ज्यानंतर रुग्णसंख्येत घट होऊन मंगळवारी ३७ लाख १५ हजार २२१ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, ६१ दिवसांत पहिल्यांदा असे झाले आहे की, कोरोनामुक्त होणारी संख्या नव्या कोरोनाबाधितांपेक्षा अधिक आहे.

- Advertisement -

२) १७ राज्यांमध्ये ५० हजारपेक्षा कमी सक्रिय रुग्ण

केंद्रीय मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात १ कोटी ९० लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. आता ३७ लाख १५ हजार सक्रिय रुग्ण आहेत. १७ राज्यांमध्ये ५० हजारपेक्षा कमी सक्रिय रुग्ण असून फक्त १३ राज्यांमध्ये १ लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.

३) देशातील मोठ्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी

देशातील प्रमुख शहरांमधून कोरोनाबाबत दिलासादायक बाब समोर येत आहेत, कारण तिथे कोरोना प्रादुर्भाव कमी होतोना दिसत आहे. गेल्या दोन आठवड्यात लखनऊ, कानपूर, वाराणसी, भोपाळ, पटना, रांची पुणे आणि सूरतमध्ये कोरोना संसर्गाचा दर कमी झाला आहे.

- Advertisement -

४) कोरोना संसर्ग दरात घट होणाऱ्या जिल्ह्यात वाढ

देशात १५ ते २१ एप्रिल दरम्यान कोरोना संसर्ग दरात घट झालेल्या जिल्ह्यांची संख्या ७३ झाली आहे. तर २९ एप्रिल ते ५ मेपर्यंत या जिल्ह्यांची संख्या वाढून १८२वर पोहोचली आहे.

५) महिन्याभरात पॉझिटिव्हीटी रेट ७० टक्क्यांवरून २३ टक्क्यांवर आला

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने लॉकडाऊनचा फायदा झाल्याचे बोलत पुण्याचे उदाहरण दिले. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव म्हणाले की, कठोर कंटेनमेंट झोनचा फायदा होत आहे. जर पुण्याकडे पाहिले तर मार्च महिन्यात येथे पॉझिटिव्हीटी रेट ६९.७ टक्के होता. तर आता २३ टक्क्यांवर आला आहे.

६) महाराष्ट्र, उत्तरप्रदेशात नव्या बाधित प्रकरणात घट

केंद्र सरकारच्या माहिनीनुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि छत्तीसगढसह १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दैनंदिन नोंद होणाऱ्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे.

७) दिल्लीत कोरोनाचा वेग झाला कमी

दिल्लीत आता कोरोनाबाधितांप्रमाणे सक्रिय रुग्ण कमी होत आहेत. गेल्या २४ दिवसांमध्ये राजधानी दिल्ली ७ हजार २२६ सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. मंगळवारी दिल्लीत १२ हजार ४८१ नवे कोरोनाबाधित आढळले. तर ३४७ जणांचा मृत्यू झाला असून १३ हजार ५८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. संक्रमण दर ३६ टक्यांवरून घट होऊन १७.७६ टक्क्यांवर पोहोचला आहे.

८) दोन महिन्यांनंतर सक्रिय रुग्णांमध्ये ३० हजार कमी

देशात ३.४८ लाख नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार २०५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात जवळपास दोन महिन्यानंतर सक्रिय रुग्णांमध्ये ३० हजारांहून अधिक घट झाली आहे आणि सक्रिय रुग्णांची संख्या ३७ लाख ४ हजार ९९वर पोहोचली आहे.

९) कोरोना मृत्यूच्या संख्येत कमी होण्यास सुरुवात

मंगळवारी केंद्र सरकारने म्हटले की, देशात नव्या कोरोनाबाधितांप्रमाणे कोरोना मृत्यूची संख्या कमी होण्याची सुरुवात दिसत होत आहे. हे कोरोनाची दुसरी लाट हळू हळू मंदावत असल्याचे संकेत देत आहे.

१०) १४ दिवसांत नवी रुग्णसंख्या ३.२९ लाख

केंदीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात १४ दिवसांत मंगळवारी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होऊन ३.२९ लाख झाली. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ३३ लाख ४० हजार ९३८वर पोहोचली आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -