घरCORONA UPDATEदेशभरात २४ तासांत ५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ हजार ४२९ नव्या रुग्णांची...

देशभरात २४ तासांत ५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ हजार ४२९ नव्या रुग्णांची भर

Subscribe

देशभरात २४ तासांत ५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून १ हजार ४२९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

वुहानमधून जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूचा विळखा अधिकच घट होताना दिसत आहे. देशभरात २४ तासांत ५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ४२९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २४ हजार ५०६ वर गेली असून सध्या १८ हजार ६६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ५ हजार ०६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ७७५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

‘कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्वप्रथम १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केला होता. त्यानंतर आता ३ मेपर्यंत वाढवला आहे. मात्र, अद्यापही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आलेली नाही. दरम्यान, देशातील रुग्णसंख्या २४ हजार ५०६ झाली आहे. पण जर भारताने वेळेत लॉकडाउन जाहीर केला नसता तर रुग्णांच्या संख्या १ लाखांहून अधिक असती’. – व्ही. के. पॉल, उच्चाधिकार गट-क्रमांक (१)चे प्रमुख

- Advertisement -

दरम्यान, महाराष्ट्र राज्यात सर्वात अधिक कोरोनारुग्ण आढळून आले आहेत. तसेच महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासारख्या शहरांची कोरोनासंबंधीची सद्यपरिस्थिती पाहता हा लॉकडाऊन जूनपर्यंत वाढवावा लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय ठाणे आणि नवी मुंबई यांनाही लॉकडाऊनचा कालावधी वाढवून दिला जाईल, असे सांगितले जात आहे. राज्य सरकारने मुंबई, पुणे आणि त्याच्या आजूबाजूच्या शहरांची स्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे. येथील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. तर राज्यात मुंबई, पुण्यामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अशा स्थितीत या शहरांचा लॉकडाऊन कालावधी वाढवला जाईल यात शंका नाही, असे राज्य सरकारने म्हटले आहे. तसेच येथील नियमही काहीसे कडक करण्यात येतील. शिवाय लोकल गाड्या, बसेस, दुकाने आणि इतर गोष्टींवरील निर्बंधही कायम ठेवले जातील, असेही त्यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – CoronaEffect: तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्याचा लॉकडाऊन जूनपर्यंत वाढेल


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -