Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Coronavirus India Update: दिलासादायक! तीन महिन्यानंतर आज ५० हजारांहून कमी नव्या कोरोनाबाधितांची...

Coronavirus India Update: दिलासादायक! तीन महिन्यानंतर आज ५० हजारांहून कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Related Story

- Advertisement -

देशात एकाबाजूला नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटाचा धोका वाढताना दिसत आहे. मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्रात देखील डेल्टा व्हेरियंटचे प्रमाण वाढत आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४२ हजार ६४० नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. ९१ दिवसांनंतर म्हणजे तीन महिन्यानंतर आज ५० हजारांहून कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच २४ तासांत १ हजार १६७ रुग्णांचा मृत्यू झाला असून ८१ हजार ८३९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

देशातील आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ कोटी ९९ लाख ७७ हजार ८६१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ८९ हजार ३०२ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ८९ लाख २६ हजार ३८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ६ लाख ६२ हजार ५२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २८ कोटी ८७ लाख ६६ हजार २०१ जणांचा लसीकरण पार पडले आहे.

- Advertisement -

२१ जूनपर्यंत देशात ३९ कोटी ४० लाख ७२ हजार १४२ जणांच्या नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी आतापर्यंत १६ कोटी ६४ लाख ३६० नमुन्यांच्या चाचण्या काल, सोमवारी दिवसभरात झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

- Advertisement -


हेही वाचा – चिंता वाढली! भारतात आढळलेल्या डेल्टा व्हेरियंटवर कोरोना लस कमी असरदार – WHO


 

- Advertisement -