घरCORONA UPDATECoronavirus India Update: देशात २४ तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक वाढ!

Coronavirus India Update: देशात २४ तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक वाढ!

Subscribe

देशात २४ तासांत आढळले ४६ हजार ९५१ नवे कोरोनाबाधित रुग्ण, २१२ जणांच्या मृत्यूची नोंद

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. आजच्या दिवशी कोरोनाच्या संकटसोबत लढण्यासाठी संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. पण आता एकदा पुन्हा एकदा तिची परिस्थिती उद्भवताना दिसत आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहून भारतीय आता पुन्हा एकदा लॉकडाऊन करा, अशी मागणी देशातील जनता करत आहे. गेल्या काही दिवसांपासूनच देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आज देखील देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे.

- Advertisement -

गेल्या २४ तासांत देशात ४६ हजार ९५१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २१२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी १६ लाख ४६ हजार ८१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ५९ हजार ९६७ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी ११ लाख ५१ हजार ४६८ जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ३ लाख ३४ हजार ६४६ जणांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत ४ कोटी ५० लाख ६५ हजार ९९८ जणांचे लसीकरण झाले आहे.

- Advertisement -

ही वाढती संख्या पाहून आता जनताच लॉकडाऊन करण्याची पुन्हा वेळ आली असे म्हणत आहे. तसेच काही जण देशातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येला जबाबदार महाराष्ट्र असल्याचे म्हणत आहेत. आज देशात ४६ हजार ९५१ नव्या रुग्णांची नोंद झाली यापैकी ३० हजार ५५३ रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातले आहेत. त्यामुळे सध्या देशातील जनता कोरोनाच्या वाढत्या संख्येला महाराष्ट्राला जबाबदार धरत आहेत. जागतिक कोरोना यादीत सध्या भारत तिसऱ्या स्थानावर असून ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. तर अमेरिका कोरोनाच्या यादीत अजूनही पहिल्या स्थानावर आहे.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: जागतिक पातळीवर महाराष्ट्राची ११व्या स्थानी झेप!


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -