घरCORONA UPDATECoronavirus India Update: देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांच्या खाली, तर मृतांच्यातही...

Coronavirus India Update: देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांच्या खाली, तर मृतांच्यातही घट

Subscribe

देशातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी आज घट पाहायला मिळाली. शुक्रवारी ५४ हजारांच्या पार गेलेली रुग्णसंख्या आज ४८ हजारांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे आज कोरोनाबाधित नव्या रुग्णसंख्येत तब्बल ३ हजारांची घसरण पाहायला मिळाली. गेल्या २४ तासांत देशात ४८ हजार ६९८ नव्य कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर १ हजार १८३ कोरोनाग्रस्तांनी आपले प्राण गमावले आहेत. दरम्यान देशातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा घट होत असल्याने काहीला दिलासा मिळत आहे. यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. देशात आज ६४ हजार ८१८ रुग्ण कोरोनामुक्त होत घरी परतले आहेत.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४८ हजार ६९८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ कोटी १ लाख ८३ हजार १४३ वर पोहचला आहे. देशात आज १ हजार १८३ कोरोना मृतांची नोंद झाल्याने देशातील कोरोना मृतांची एकूण संख्या ३ लाख ९४ हजार ४९३ झाली आहे. तर देशात सध्या ५ लाख ९५ हजार ५६५ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालय तसेच घरीचं उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या ३१ कोटी ५० लाख ४५ हजार ९२६ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच देशात आत्तपर्यंत ४० कोटी १८ लाख ११ हजार ८९२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यातील १७ लाख ४५ हजार ८०९ चाचण्या २५ गेल्या २४ तासांत झाल्याचे आयसीएमआरने सांगितले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -