घरताज्या घडामोडीCoronavirus India Update: देशात ८८ दिवसांनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; २४ तासांत...

Coronavirus India Update: देशात ८८ दिवसांनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; २४ तासांत १,४२२ रुग्णांचा मृत्यू

Subscribe

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. यामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. काल, बुधवारी देशात ८१ दिवसांनंतर ६० हजारांहून कमी नव्या रुग्णसंख्येची नोंद झाली होती. आज देखील ८८ दिवसांनंतर नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत ५३ हजार २५६ नव्या रुग्णांची वाढ झाली असून १ हजार ४२२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ७८ हजार १९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ कोटी ९९ लाख ३५ हजार २२१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ८८ हजार १३५ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ८८ लाख ४४ हजार १९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ७ लाख २ हजार ८८७ रुग्ण सक्रिय आहेत.

- Advertisement -

आतापर्यंत देशात २८ कोटी ३६ हजार ८९८ लसीकरण पार पडले आहे. देशात २० जूनपर्यंत ३९ कोटी २४ लाख ७ हजार ७८२ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल, रविवार दिवसभरात १३ लाख ८८ हजार ६९९ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने (आयसीएमआर) दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान लसीकरण मोहिमेला वेग वाढवण्यासाठी आजपासून मोफत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यामध्ये १८ वर्षांवरील वयोगटातील व्यक्तींना लस दिली जाणार आहे. याचा पूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.


हेही वाचा – Corona Vaccination: गुडन्यूज! उद्यापासून देशभरात मोफत लसीकरण; CoWIN Appवर नोंदणी करणे बंधनकारक नाही


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -