Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Coronavirus India Update: देशात ३ हजारांनी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ; २४...

Coronavirus India Update: देशात ३ हजारांनी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ; २४ तासांत ५४,०६९ रुग्णांची नोंद

Related Story

- Advertisement -

देशात आता नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. काल, बुधवारी ८ हजार २०८ने नव्या कोरोनाबाधितांची वाढ होऊन ५० हजार ८४८ रुग्णांची २४ तासांत नोंद झाली आहे. आजही ३ हजार २२१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून देशात २४ तासांत ५४ हजार ०६९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर २४ तासांत १ हजार २३१ जण मृत्यूमुखी पडले असून ६८ हजार ८८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ८२ हजार ७७८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ९१ हजार ९८१ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ९० लाख ६३ हजार ७४० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या देशात ३ लाख ९१ हजार ९८१ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशात ३० कोटी १६ लाख २६ हजार २८ जणांची लसीकरण पार पडले आहे.

- Advertisement -

आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ९६.६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांच्या खाली आला आहे, सध्या ३.०४ टक्के आणि दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट २.९१ टक्के झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, देशात २३ जूनपर्यंत ३९ कोटी ७८ लाख ३२ हजार ६६७ नमुन्यांची चाचणी केली आहे. यापैकी काल, बुधवारी दिवसभरात १८ लाख ५९ हजार ४६९ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत.

- Advertisement -