Coronavirus India Update: देशात ७० दिवसांनंतर ८४ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद; ४,००२ रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येचा आलेख उतरताना दिसत आहे. आज ७० दिवसानंतर ८४ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. म्हणजे गेल्या २४ तासांत देशात ८४ हजार ३३२ नवे कोरोनाबाधित आढळले असून ४ हजार २ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १ लाख २१ हजार ३११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ९३ लाख ५९ हजार १५५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ६७ हजार ८१ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ७९ लाख ११ हजार ३८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या १० लाख ८० हजार ६९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशात २४ कोटी ९६ लाख ३०४ जणांचे लसीकरण पार पडले आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता करण्यात आली असून अनलॉक केले गेले आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात ११ हजार ७६६ नव्या कोरोनाबाधित नोंद झाली असून ८ हजार १०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २ हजार ६१९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५८ लाक ८७ हजार ८५३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६ हजार ३६७ जणांचा मृत्यू झाला असून ५६ लाख १६ हजार ८५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात १ लाख ६१ हजार ७०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – Covid-19 Vaccine: दर ६ महिन्यांनी घ्यावा लागणार लसीचा बूस्टर डोस? WHO ने दिलं उत्तर