Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Coronavirus India Update: देशात २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत घट, तर ३,४०३ रुग्णांच्या...

Coronavirus India Update: देशात २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत घट, तर ३,४०३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद

Related Story

- Advertisement -

देशात मागील काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. पण काल, गुरुवारी अचानक कोरोना मृत्यूच्या संख्येत वाढ झाली. ६ हजारांहून अधिक रुग्ण मृत्यू झाल्याची नोंद झाली. पण आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ताज्या आकडेवारी जारी केल्यानुसार, गेल्या २४ तासांत ९१ हजार ७०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३ हजार ४०३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १ लाख ३४ हजार ५८० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २ कोटी ९२ लाख ७४ हजार ८२३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ६३ हजार ७९ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ७७ लाख ९० हजार ७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ११ लाख २१ हजार ६७१ जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत २४ कोटी ६० लाख ८५ हजार ६४९ जणांचे कोरोना लसीकरण पार पडले आहेत.

- Advertisement -

देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात गुरुवारी १२ हजार २०७ नवे रुग्ण आढळले, तर १ हजार ९१५ रुग्ण मृत्यूमुखी पडले. तसेच ११ हजार ४४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आता महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५८ लाख ७६ हजार ८७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३ हजार ६४८ जणांचा मृत्यू झाला असून ५६ लाख ८ हजार ७५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात १ लाख ६० हजार ६९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – Corona Mutant: धक्कादायक! पुण्यातील सांडपाण्यात आढळले कोरोनाचे १०८ म्युटंट!


 

- Advertisement -