घरदेश-विदेशCoronavirus: देशात आतापर्यंत ३०२९ रूग्णांचा बळी; बाधितांचा आकडा ९६ हजारांच्या पुढे!

Coronavirus: देशात आतापर्यंत ३०२९ रूग्णांचा बळी; बाधितांचा आकडा ९६ हजारांच्या पुढे!

Subscribe

भारतात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ९६ हजार १६९ झाली असून यापैकी ५५ हजार ८७२ केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर ३६ हजार ७९५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला असून हा चौथा टप्पा ३१ मेपर्यंत लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात नियम कठोर केले असले तरी कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचेच दिसत आहे.

३६ हजारांहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ९६ हजार १६९ झाली असून यापैकी ५५ हजार ८७२ केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर ३६ हजार ७९५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. मात्र दुर्दैवाने भारतातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूंनी आता ३ हजारांचा आकडा पार केला असून ही संख्या आता ३,०२९ वर पोहोचली आहे.


Live Corona Update: आज रात्री ८ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह येणार

- Advertisement -

 

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, देशात मागील २४ तासांत नवे ५ हजार २४२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंतचे एका दिवसात सर्वाधिक आढळून आलेले हे रुग्ण आहेत. तर मागील २४ तासांमध्ये १५७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

बाधितांच्या आकड्यांमध्ये झपाट्याने वाढ

भारतात कोरोना बाधितांच्या आकड्यांमध्ये झपाट्याने वाढ होत असून मागील ३ दिवसांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर १३.६ दिवस असा झाला आहे. तर मागील १४ दिवसांत हा दर ११.५ वर होता. देशात रविवारी कोरोना व्हायरसचे साधारण ५ हजार नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, कोरोनाच्या मृत्यूदरात घट होऊन ३.१ टक्क्यांवर आला आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या आकडेवारीत वाढ झाली असून हा दर ३७.५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -