घरCORONA UPDATEदेशात कोरोनाचा कहर! २४ तासांत आढळले ८१ हजारांहून अधिक रुग्ण

देशात कोरोनाचा कहर! २४ तासांत आढळले ८१ हजारांहून अधिक रुग्ण

Subscribe

देशात सातत्याने कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात ८१ हजार ४६६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५० हजार ३५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी २३ लाख ३ हजार १३१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६३ हजार ३९६ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी १५ लाख २५ हजार ३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ६ लाख १४ हजार ६९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत ६ कोटी ८७ लाख ८९ हजार १३८ जणांचे कोरोना लसीकरण पार पडले आहे.

- Advertisement -

काल (गुरुवार)पासून देशभरात ४५ वयोगटातील लोकांनी लस घेण्यास सुरुवात केली. काल दिवसभरात ३६ लाख ७१ हजार २४२ जणांना कोरोनाची लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

तसेच १ एप्रिलपर्यंत देशभरात २४ कोटी ५९ लाख १२ हजार ५८७ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. यापैकी आतापर्यंत ११ लाख १३ हजार ९६६ नमुन्यांच्या चाचण्या काल दिवसभरात करण्यात आल्या, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

- Advertisement -


हेही वाचा – हवेतल्या कोरोना विषाणूंचा खात्मा हवेतच, CSIR कडून स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान उपलब्ध


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -