CoronaVirus: कोरोनाचा सामुहिक संसर्ग भारतात होत नाही; WHOने चूक केली मान्य

CoronaVirus
कोरोना व्हायरस

जागतिक आरोग्य संघटनेने सिच्युएशन रिपोर्ट म्हणजे सद्य परिस्थितीच्या अहवालामध्ये भारतात कोरोना विषाणूच्या फैलावाची स्थिती सामूहिक संसर्ग असल्याचं स्पष्ट केलं. मात्र आता एका वृत्तवाहिनीशी बोलताना जागतिक आरोग्य संघटनेने या अहवालात चूक झाली असल्याचं मान्य केलं आहे. आता अहवालात सुधारणा करण्यात आली आहे. भारतात कोरोनाचा प्रसार क्लस्टर पद्धतीने होत आहे. परंतु सामुहिक संसर्ग नाही.

जगात कोरोनाग्रस्तांचा संख्या १६ लाखांहून अधिक आहे आणि ९७ हजारहून अधिक लोकांचे बळी गेले आहे. कोरोनाग्रस्तांबाबत जारी केलेल्या अहवालात चीनने कोरोनाचा प्रसार क्लस्टर पद्धतीने होत असल्याचं लिहिलं आहे. तर भारतातील कोरोनाच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर सामुहिक संसर्ग असल्याचं म्हटलं आहे.

केंद्र सरकारने हे मान्य केलं नसून अजून भारत तिसऱ्या फेजमध्ये पोहोचल नसल्याचं स्पष्ट केलं आहे. जेव्हा कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असेल आणि संशयितांना शोधण्यास कठीण होईल. त्याला सामुहिक संसर्गाची परिस्थिती म्हटलं जातं. भारतात आतापर्यंत ६ हजार ९१२ कोरोनाग्रस्त आढळले असून २३० जणांचा मृत्यू झाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, रोगाचा प्रसार होण्याचे प्रमाण क्लस्टर पद्धतीने होत असतं. याबाबतची माहिती देशातील सदस्यांकडून दिली जाते. चीनमध्ये अज्ञात कारणामुळे झालेला न्यूमोनियाच्या पहिल्या घटनेनंतर जागतिक आरोग्य संघटनेच्याद्वारे सूचित करण्यात आले. त्यानंतर हा रोग काही वेळात संपूर्ण जगात पसरला. मग शुक्रवारी कोविड-१९चा पहिली घटना सूचित केली. आता याला १०० दिवस उलटून गेले.


हेही वाचा – CoronaVirus: सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी झाडावर बांधलं घर!