घरताज्या घडामोडीएका हातात बेड्या तर दुसऱ्या हातात दारुचा ग्लास; कोविड रुग्णालयातील दृश्य

एका हातात बेड्या तर दुसऱ्या हातात दारुचा ग्लास; कोविड रुग्णालयातील दृश्य

Subscribe

टेबलावर जेवण, एका हातात बेड्या तर दुसऱ्या हातात दारुचा ग्लास ही दृश्य एका कोविड सेंटरमधील असल्याचे समोर आले आहे. झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातील कोविड रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार समोर आला असून या कोरोनाबाधित आरोपीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फोटो व्हायरल झाल्यानंतर याची दखल मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी घेतली असून याप्रकरणी सत्यतेची चौकशी करुन संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

नेमके काय घडले?

धनबादच्या कतरास पोलीस स्टेशन भागातून या तरुणाला मारहाण, खंडणी आणि छेडछाडीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपीची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या आरोपीला कोविड-१९ रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपण किती शक्तीशाली आहोत हे दाखवण्यासाठी आरोपीने आपले फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर टाकले आहेत. त्यानंतर त्याचे सर्व फोटो व्हायरल झाले आहेत.

- Advertisement -

कोविड – १९ रुग्णालयात आरोपी दारु पिऊन मजा करत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये आरोपीच्या हातात बेड्या असून तो दुसऱ्या हातात असलेल्या ग्लासात दारु ओताना दिसत आहे. तसेच त्याच्या टेबलावर जेवण देखील असून तो तिथे दारु पार्टीची मजा घेत आहे.


हेही वाचा – Unlock 4.0: जाणून घ्या, १ सप्टेंबरपासून कोणत्या गोष्टी सुरू होऊ शकतात…


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -