घरदेश-विदेश'या' देशात एक कोरोना बाधित आढळल्यानंतर केले होते संपूर्ण लॉकडाऊन; आता १५...

‘या’ देशात एक कोरोना बाधित आढळल्यानंतर केले होते संपूर्ण लॉकडाऊन; आता १५ ऑक्टोबरपर्यंत केली वाढ

Subscribe

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचं संकट देशासह जगातून पूर्णतः नष्ट झाले नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, भारतासारख्या देशात वेगाने कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाल्याने कोरोनाच्या संसर्गाची गती नियंत्रित करण्यात आली आहे, परंतु अमेरिकेसारख्या देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतांना दिसतोय. अमेरिकेसोबतच कोरोना अनेक युरोपियन देशांमध्येही कहर करत असल्याने या देशांची पुन्हा चिंता वाढली आहे. या महामारीवर मात करण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन तसेच लसीचा पर्याय देखील स्वीकारला आहे. अशा देशांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा समावेश असून जिथे कोरोनाला नियंत्रण ठेवण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा पहिला रुग्ण समोर आला होता. त्यानंतर सरकारने ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली आणि या राजधानीत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑस्ट्रेलिया कदाचित पहिला देश असेल ज्या ठिकाणी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. असे असतानादेखील आता कॅनबेरामध्ये कोरोनाची २२ नवे रूग्ण सापडल्यानंतर लॉकडाऊनमध्ये १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियन राजधानीचे मुख्यमंत्री अँड्र्यू बर्र यांनी असे सांगितले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कॅनबेराचे लॉकडाउन १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवले ​​जाणार आहे. कॅनबेरा हे न्यू साउथ वेल्स राज्याने वेढलेले असून जिथे ऑस्ट्रेलियात डेल्टाच्या पहिल्या रूग्णाची नोंद करण्यात आली आहे.कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकार बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाले आहे. ४ लाख ३० हजार लोकांच्या शहरात १० जुलै २०२० पासून कॅनबेरामध्ये डेल्टाचा प्रसार होण्यापूर्वी कोरोनाव्हायरस कम्युनिटी ट्रान्समिशनच्या एकाही रूग्णाची नोंद करण्यात आली नव्हती. त्यामुळे कदाचित पहिल्या रूग्णाची नोंद करण्यात आल्यानंतर येथे लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.


करुणा शर्माचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम १८ सप्टेंबरपर्यंत वाढला

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -