घरCORONA UPDATEदेशातील 'या' राज्याने मिळवले कोरोनावर नियंत्रण; कसे ते पहा

देशातील ‘या’ राज्याने मिळवले कोरोनावर नियंत्रण; कसे ते पहा

Subscribe

देशातील एका राज्याने कोरोनासारख्या व्हायरसवर सहज नियंत्रण मिळवले आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने संपूर्ण देशाला वेढले आहे. या कोरोनाचा विषाणू सर्वात पहिला केरळमध्ये सापडला होता. पण त्याच केरळमध्ये आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. तर देशातील अन्य राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. मात्र, केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण अवघे तीन ते चार आहे. केरळने कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा आलेख कमी केला आहे. या राज्याने कोरोनावर कसे नियंत्रण मिळवले? याचे वृत्त इंडियाने टुडेने दिले आहे.

असे मिळवले नियंत्रण

केरळने सर्वप्रथम कोरोना चाचण्यांचा वेग वाढवून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची ओळख पटवली. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. नंतर त्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला २८ दिवस क्वॉरंटाइन केले.

- Advertisement -

३० जानेवारीला केरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यांनंतर १३ एप्रिलला ही संख्या ३७८ वर गेली होती. तर दोन जणांचा त्यात मृत्यू झाला होता. मात्र, दिलासादायकबाब म्हणजे यातील १९८ कोरोनाग्रस्त पूर्णपणे बरे झाले. २७ मार्चला केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक ३९ रुग्ण आढळले. १२ एप्रिलला म्हणजे दोन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात अवघे दोन कोरोनाग्रस्त आढळले. तर १८ जानेवारीला केरळच्या आरोग्य मंत्रालयाने कोविड – १९ चा अलर्ट जाहीर केला आणि परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरु केली.

हेल्थ कार्ड भरुन घेतले जायचे

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना एक हेल्थ कार्ड दिले जायचे. त्यामध्ये त्या प्रवाशाची हिस्ट्री आणि अन्य आजार याबद्दलची माहिती भरुन घेतली जाते. विशेष म्हणजे विमानतळावर रुग्णवाहिका तर जिल्हा रुग्णालयात इमर्जन्सीची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच एखाद्या व्यक्तीला जर ताप, सर्दी, खोकला आणि घशाचा त्रास अशी लक्षणे आढळून आल्यास त्या व्यक्तीला कोरोनाच्या वॉर्डमध्ये हलवण्यात यायचे.

- Advertisement -

दरम्यान, ४ फ्रेबुवारी रोजी कोविड – १९ चा राज्यासाठी धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे खबरदारी म्हणून चेहऱ्याला मास्क, व्यक्तीगत सुरक्षा आणि औषधांची खरेदी केली. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयांना आयसोलेशन वॉर्डची व्यवस्था करायला सांगितली. अशा प्रकारे उपाययोजना करुन केरळने कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवले.


हेही वाचा – लॉकडाऊन वाढल्याने रेल्वे मंत्र्यांने घेतला महत्त्वाचा निर्णय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -