घरताज्या घडामोडीCorona Live Update: हिमाचल प्रदेशचे ऊर्जामंत्री सुखराम चौधरी यांना कोरोनाची लागण!

Corona Live Update: हिमाचल प्रदेशचे ऊर्जामंत्री सुखराम चौधरी यांना कोरोनाची लागण!

Subscribe

हिमाचल प्रदेशचे ऊर्जामंत्री सुखराम चौधरी यांच्यी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ३० जुलै रोजी त्यांनी शिमला येथे राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.  (शपथविधी सोहळा, फोटोत सुखराम चौधरी हे उजवीकडे आहेत)

- Advertisement -

गोव्यात आज दिवसभरात १९१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून दोन रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे गोव्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७ हजार ६१४वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात गोव्यात १६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ५ हजार ४५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर सध्या २ हजार ९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी गोव्याच्या आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.


धारावीत आज ८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सध्या ८२ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत २ हजार २५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ५९७वर पोहोचला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.


पश्चिम बंगाल मधील माकप कामगार संघटनेचे ज्येष्ठे नेते आणि राज्याचे माजी परिवहन मंत्री श्यामल चक्रवर्ती यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी कलकत्ता येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती.


खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या घरातील आतापर्यंत ११ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांचा आणि सासू-सासऱ्यांचा समावेश आहे. नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे कुटुंबातील सदस्याच्या संपर्कात होते. त्यामुळे नवनीत राणांनंतर रवी राणा यांचा देखील रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


२४ तासांत १३७ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

देशभरासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. बुधवारी आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत १० हजार ३०९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३३४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर कोरोना योद्धा म्हणून नागरिकांचे रक्षण करणारे महाराष्ट्र पोलीस देखील कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. गेल्या २४ तासात १३७ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाची लागण झाली असून त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. (सविस्तर वाचा)


चीनमध्ये नव्या व्हायरसचा फैलाव!

चीनच्या वुहानमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले आहे. मात्र या कोरोना विषाणूनंतर आता चीनमध्ये एक नवीन विषाणूचा फैलाव होत आहे. यामुळे चीनमध्ये आतापर्यंत ७ लोकांचा मृत्यू झाला असून ६० लोक आजारी आहेत. ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, पूर्व चीनच्या जियांगशू आणि अनहुई प्रांतात बरेच लोक आजारी पडले आहेत. हा विषाणू एखाद्या कीड्याने चावा घेतल्यास पसरतो.

या विषाणूमुळे जियांगशूमध्ये ३७ आणि अनहुईमध्ये २३ लोक आजारी आहेत. दोन्ही राज्यात या नवीन विषाणूमुळे आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसचे नाव हुईयांगशान बनयांगव्हायरस (Huaiyangshan banyangvirus) असे असल्याचे सांगितले जात आहे. आजतकने दिलेल्या माहितीनुसार याला सामान्य भाषेत (SFTS) व्हायरस देखील म्हणतात. (सविस्तर वाचा)


देशात आतापर्यंत २ कोटी २१ लाखाहून अधिक चाचण्या!

जगभर पसरणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या प्रमाणात पसरत आहे. त्या वेगाने आता रुग्णांच्या चाचण्यांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार; देशभरात २४ तासांत ६ लाख ६४ हजार ९४९ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर देशात आतापर्यंत २ कोटी २१ लाख ४९ हजार ३५१ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. (सविस्तर वाचा)


जगात १८ कोटीहून अधिक जण बाधित

जगात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. जगात आतापर्यंत कोरोनाबाधित आकड्यात सर्वात मोठी वाढ झाली असून सध्या १८ कोटी ९७ लाख ५ हजार २८० जण कोरोनाबाधित झाले आहेत. तर आतापर्यंत ७ लाख ११ हजार २२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत जगात १२ कोटी १६ लाख ३ हजार ७५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या जगात ६ लाख १० हजार ३०६ जण Active आहेत. त्यामुळे एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात देखील तेवढ्याच वेगाने केली जात आहे, अशी माहिती आरोग्य व कुटुंब मंत्रालयाने दिली आहे.


कोविड रुग्णालयात भीषण आग

गुजरात अहमदाबाद येथील नवरंगपुरामधील श्रेय हॉस्पिटलमध्ये आज पहाटे भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीत ८ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर इतर ३५ रूग्णांना तातडीने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात गेल्या २४ तासांत १० हजार ३०९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३३४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख ६८ हजार २६५वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत १६ हजार ४७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार १६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ५ हजार ५२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.२५ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यदर ३.५२ टक्के एवढा आहे. सध्या राज्यातील १ लाख ४५ हजार ९६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -