घरCORONA UPDATECorona Live Update: गेल्या २४ तासांत मुंबईत १,३५९ कोरोनाचे नवे रुग्ण, ७७...

Corona Live Update: गेल्या २४ तासांत मुंबईत १,३५९ कोरोनाचे नवे रुग्ण, ७७ जणांचा मृत्यू!

Subscribe

गेल्या २४ तासांत मुंबईत १,३५९ कोरोनाचे नवे रुग्ण

मुंबईत मागील २४ तासांत १ हजार ३५९ कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६१ हजार ५०१ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ३ हजार २४२ झाली आहे. तसेच आज २९८ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत मुंबईत ३१ हजार ३३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

आज राज्यात ३३०७ नव्या रुग्णांची नोंद; ११४ बाधितांचा मृत्यू

राज्यात बुधवारी ३३०७ नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १,१६,७५२ झाली. यामध्ये ५१,९२१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ११४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ५६५१ झाली आहे. आज १३१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत ५९,१६६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.६८ % एवढे आहे. (सविस्तर वाचा

- Advertisement -

अंबरनाथला ७ कोटींचा निधी मंजूर

कोरोनाच्या दिवसेंदिवस वाढत्या संक्रमनाला आळा घालण्यासाठी अंबरनाथ शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याकरिता राज्य सरकारने अंबरनाथ शहराकरिता ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मंगळवारी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव  महेश पाठक यांची आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी भेट घेत अंबरनाथ व उल्हासनगर शहरातील कोरोना संदर्भातील परिस्थिती बिकट असल्याचे सांगितले.

यावेळी बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून प्रभावी उपाययोजना राबविण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.  या अनुषंगाने नगरविकास विभागाने निधीची मागणी मंजूर करत बुधवारी याबाबतचे आदेशपत्र काढले आहे.


कल्याण डोंबिवलीत १३५ नवे रुग्ण

कल्याण डोंबिवलीतील आज सलग सहाव्या दिवशी देखील कोरोनाच्या रुग्ण संख्येने शंभरीचा आकडा पार केला असून आज एकाच दिवशी तब्बल १३५ रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. तसेच आज दोन जणांचा कोरोनाने मृत्यू देखील झाला आहे. यामध्ये डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगर इंदिरानगर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा आणि कल्याण पूर्वेतील कैलास नगर येथील ६६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

केडीएमसी क्षेत्रात मागील २४ तासात तब्बल १३५ नवीन रुग्णांची भर पडली असून आजच्या या १३५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या २५९३ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला असून ११७६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल १३२८ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.


दिल्लीतील आरोग्य मंत्र्यालाच झाला कोरोना

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आरोग्यमंत्री सत्यंदर जैन यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. चाचणी केल्यानंतर त्यांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती दिल्लीच्या आरोग्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. आज त्यांची कोरोनाची दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली. सत्येंद्र जैन यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांची काल केलेली कोविड चाचणी निगेटिव्ह आली होती.


देशभरात १.८ टक्क्यांनी वाढतायेत करोनाचे रुग्ण

कोरोनाच्या संसर्गाच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे, परंतु तरीही देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या फारशी वाढत नाही. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील सक्रिय रूग्णांची संख्या केवळ १.८ टक्के या दराने वाढत आहे. अमेरिका, ब्राझीलमध्ये ही संख्या पाच ते सहा टक्केे आहे. गेल्या सात दिवसांत भारतात संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये २९.५ टक्के वाढ झाली आहे. जगात इतर देशांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. (सविस्तर वाचा)


सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र आणि राज्य सरकारला डॉक्टर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत देण्याबाबत आदेश जारी केला आहे. सविस्तर वाचा


गेल्या २४ तासांत सर्वाधिक २ हजार ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १० हजार ९७४ नवीन कोरोना रुग्णांचा नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण बाधितांचा आकडा ३ लाख ५४ हजार ६५वर पोहचला आहे. तर १ लाख ५५ हजार २२७ अॅक्टिव्ह रुग्ण असून १ लाख ८६ हजार ९३५ जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच आतापर्यंत ११ हजार ९०३ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


औरंगाबादमध्ये आज ९६ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार २८वर गेला आहेत. तर १ हजार ६५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १ हजार २०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १६३ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


जगात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. आतापर्यंत जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ८२ लाख पार झाला आहे. तर साडे चार लाखांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच दिलास देणारी बाब म्हणजे आतापर्यंत ४३ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा 


कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह १५ राज्यातील प्रमुखांशी चर्चा करणार आहे. अनलॉक-१ जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीचा पहिला संवाद असणार आहे. सविस्तर वाचा 


मंगळवारी दिवसभरात राज्यात २७०१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आणि कोरोना रुग्णांचा एकूण आकडा १ लाख १३ हजार ४४५ इतका झाला आहे. याशिवाय, ८१ कोरोना रुग्णांचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजचे ८१ आणि याआधीचे समाविष्ट करण्यात आलेले १३२८ अशा एकूण १४०९ मृत्यूंची आज नव्याने भर पडली आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृतांचा आकडा ५ हजारांच्या वर गेला असून ५ हजार ५३७ इतका झाला आहे. सविस्तर वाचा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -