घरताज्या घडामोडीधक्कादायक! लॉकडाउनदरम्यान विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार

धक्कादायक! लॉकडाउनदरम्यान विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार

Subscribe

लॉकडाउन दरम्यान एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाउन घोषित केले आहे. अनेक ठिकाणी लॉकडाउन केल्याने रस्त्यावर शुकशुकाट पाहिला मिळत असून याचाच फायदा घेऊन १० नराधमांनी एका १६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना झारखंडमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

झारखंडमधल्या दुमका शहरातील शिवपहार येथे भाड्याच्या घरात ही पीडिता राहत होती. तसेच ही तरुणी एसपी महाविद्यालयात शिकत आहे. मात्र, सध्या देशात लॉकडाउन केल्याने महाविद्यालय बंद आहे. तसेच रस्त्यावर वाहनांची वर्दळ केली कमी झाली आहे. दरम्यान, २४ मार्चला ही तरुणी आपल्या मैत्रीणीसोबत घरी परतत होती. गावाच्या वेशीवर आल्याने पीडितीची मैत्रीण आपल्या घरी निघून गेली. तसेच आता पुढील रस्ता एकटीला घरी जावे लागणार म्हणून तिने आपल्या घरच्यांना फोन करुन बोलावले. पण, कोणी परतले नाही. अखेर तिने तिच्या गावातील मित्र विक्की उर्फ प्रसन्नजित हंसदा याला फोन करुन बोलावून घेतले. विक्की त्याच्या मित्रासोबत पीडिती उभी असलेल्या ठिकाणी पोहोचला.

- Advertisement -

दरम्यान, विक्कीने घरी जाण्याच्या रस्त्यावर गाडी न वळवता. दुसऱ्या दिशेने गाडी वळवली. याबाबत पीडितीने विक्कीला विचारणा केली असता, विक्की म्हणाला की, त्या रस्त्यावर पोलीस असून ते तपासणी करत आहेत, म्हणून आम्ही कच्च्या रस्त्यावरुन आलो. काही वेळाने निर्जन जंगलाजवळ दुचाकी थांबवली आणि शौचालयाला जातो असे सांगितले. खूप वेळ पीडिती विक्कीच्या अज्ञात मित्रासोबत त्याठिकाणी उभी होती. त्यानंतर विक्की आणि त्याच्या मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याठिकाणी आठ जण आले आणि त्यांनी देखील त्या पीडितीवर आळीपाळीने बलात्कार केला. तसेच तिच्या गळावर चाकू धरुन तिला जिवे मारण्याची धमकी देखील दिली.

त्यानंतर रात्रभर जंगलात बेशुद्धावस्थेत सोडून ते नराधम तिथून पसार झाले. दुसऱ्या दिवशी शुद्ध आल्यानंतर ही पीडिती कशीबशी जंगलातून रस्त्यावर आली. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी तिच्या घरातल्याना दिली. त्यानंतर घटनास्थळी आई – वडिल आणि भाऊ आले आणि तिला घेऊन गेले. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांनी दिली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या तरुणीवर रुग्णालात उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – कोणीही उपाशी झोपणार नाही – अरविंद केजरीवाल


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -