घरCORONA UPDATEलॉकडाऊनचं उल्लंघन, सामूहिक नमाज अदा करण्याऱ्या १५ जणांना अटक

लॉकडाऊनचं उल्लंघन, सामूहिक नमाज अदा करण्याऱ्या १५ जणांना अटक

Subscribe

३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहारनपूर जिल्ह्यात शुक्रवारी पोलिसांनी उमाही कला गावातून नमाज अदा करण्याऱ्या १५ जणांना अटक केली. मात्र, बरेच लोक पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी अटक केलेल्या सर्व लोकांवर गुन्हा दाखल करून त्यांना तुरूंगात पाठवलं आहे. दुपारी दीडच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की उमाही येथील जकारिया मशिदीत मोठ्या प्रमाणात गावकरी सरकारी आदेशाचे उल्लंघन करीत नामाज अदा करत आहेत. पोलिसांनी माहिती मिळताच एहसान, शेरदीन, फरमान, शकीर, परवेझ, यामीन, हम्मद, इस्त्राईल, सद्दाम, दिलशाद, मार्गगुब, सलमान, जरीफ, साबिर आणि अलीम यांना घटनास्थळावरून अटक केली.

दरम्यान, पोलिसांनी फरार असलेल्या १५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. गावात पीएसी फोर्स तैनात करण्यात आली आहे. पोलिस स्टेशनचे प्रभारी जितेंद्र सिंग यांनी सांगितलं की १५ जणांची नावे आहेत, तर अज्ञात १५ जणांची ओळख पटलेली आहे. या सर्वांवर कलम १८८, २६९, २७० आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Big Breaking: लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवला


देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३५ हजार पार

देशात कोरोनाचे रुग्ण दिवसागणीक वाडत आहेत. देशात कोरोनाबाधीतांचा आकडा ३५ हजार ९०९ वर पोहोचली आहे. तर आता पर्यंत १ हजार १८५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ९ हजार ६४८ रुग्ण बरे झाले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -