घरCORONA UPDATEVideo : भूक भागवण्यासाठी त्यांच्यावर आली किंग कोब्रा खाण्याची वेळ!

Video : भूक भागवण्यासाठी त्यांच्यावर आली किंग कोब्रा खाण्याची वेळ!

Subscribe

हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.  वन्यजीव संरक्षण अधिनियमांनुसार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवसेंदिवस राज्यात कोरोनाच्या रूग्णात झपाट्याने वाढ होत आहे.  त्यामुळे केंद्र सरकारने ३ मे पर्यंत शहरात लॉकडाभन जाहीर केला आहे. पण याचा परिणाम मात्र रोजंदारीवर असणाऱ्या मजुरांच्या जनजीवनावर झाला आहे. त्यामुळे सध्या मजुर हालाकीचे जीनव जगताना दिसत आहेत. दोन वेळेची पोटाची भुक भागवण्यासाठी मजुरांना त्रास सहन करावा लागत आहे. अशीच काहीशी घटना अरूणाचल प्रदेशमध्ये घडली आहे. तीन जणांनी भूक भागवण्यासाठी १२ फूटांचा किंग कोब्रा खाल्ला आहे.

सध्या सोशल मीडियावर हा व्हीडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत तीघा जाणांच्या हातात एक किंग कोब्रा दिसत आहे. त्या माणसांचं म्हणणं आहे की, घरात खायला काही नाहीये, त्यामुळे या सापाला मारलं आहे आणि आम्ही त्याला आता खाणार आहोत. घरातील भाजी, डाळ, तांदूळ सगळं संपलं आहे. नालजास्तव आम्ही त्याला मारलं आहे. . सापला कापून त्याचं मांस साफ करत आहेत. स्वच्छ केलेलं मांस केळीच्या पानावर ठेवलं आहे. कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे घरात खाण्यासाठी काहीही नाही, तांदूळही शिल्लक नाहीत. त्यामुळेच आम्ही जंगलामध्ये खाण्यासाठी काही शोधत होतो. त्यावेळीच आम्हाला किंग कोब्रा मिळाला, असं व्हिडिओत एक व्यक्ती बोलत असल्याचं स्पष्ट ऐकू येत आहे.

- Advertisement -

हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.  वन्यजीव संरक्षण अधिनियमांनुसार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तिघेही पसार आहेत.


हे ही वाचा – ‘संतांची, वीरांची नाही ही नराधमांची भूमी’ पालघर घटनेवर सुमीत राघवन संतापला!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -