Video : बँकेचा कॅशिअर इस्त्री आणि चिमटा घेऊन थेट बँकेत; कोरोनाविरोधात जुगाड

कोरोपासून बचाव करण्यासाठी बँकेच्या कॅशिअरने जुगाड केला आहे.

coronavirus lockdown banker uses steam iron to disinfect cheques twitter applauds anand mahindra shares clip
बँकेच्या कॅशिअरने केला जुगाड

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाची दहशत असतानाही अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी त्यांचे काम चोख बजावत आहेत. मात्र, आपले संरक्षण करण्यासाठी काही कर्मचारी कामासोबतच खबरदारी म्हणून नवनवे उपाय देखील करत आहेत. असाच बँक कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बँकेचा एक कॅशिअर कशाप्रकारे कोरोना पासून बचावण्यासाठी जुगाड करत आहे. ते दिसून येत आहे.

काय आहे हा व्हिडिओ

हा व्हिडिओ नेमका कोणता आहे, याबाबत अधिकृत माहिती नाही, पण गुजरातमधील एका बँकेचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये बँक कर्मचारी चक्क इस्त्री आणि चिमटा घेऊन बसल्याचे दिसत आहे. हा कॅशिअर आपल्या काऊंटवर आलेली प्रत्येक पावती किंवा चेक तो चिमट्याने घेऊन नंतर शेजारी असलेली इस्त्री त्यावर फिरवताना दिसत आहे. विशेष म्हणजे या कॅशिअरचा व्हिडिओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही रिट्विट करत या बँक कर्मऱ्याचे कौतुक केले आहे. ‘कॅशिअर वापरत असलेली पद्धत करोनावर किती परिणामकारक आहे याची कल्पना नाही. पण, त्याने जी शक्कल लढवली त्याचे श्रेय त्याला मिळालया पाहिजे’, असे ट्विट महिंद्रा यांनी केले आहे.


हेही वाचा – कोरोनाची लागण झालेल्या ९ महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू