घरदेश-विदेशCorona: लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दाम्पत्याने केले पोलिसांना च्यवनप्राशचे वाटप!

Corona: लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दाम्पत्याने केले पोलिसांना च्यवनप्राशचे वाटप!

Subscribe

जीवघेण्या कोरोनाशी थेट लढा देणाऱ्या सर्व कर्मचार्‍यांची रोग प्रतिकारशक्ती अधिक असणं महत्त्वाचे आहे., म्हणून केले च्यवनप्राशचे वाटप

दरवर्षी उत्साहात जोरदार आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करणारे 60 वर्षीय कृष्ण झालानी यांनी यावेळी लॉकडाऊन दरम्यान ड्युटीवर असलेल्या पोलिसांना च्यवनप्राशचे वाटप करून साजरा केला. कोरोनाचा धोका रोखण्यासाठी या दाम्पत्याने जयपूरच्या परकोटे येथील कोतवाली पोलिस ठाण्याच्या वेगवेगळ्या भागात लॉकडाऊन आणि कर्फ्यूमध्ये तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना 150 च्यवनप्राशचे बॉक्स वितरीत केले.

जीवघेण्या कोरोनाशी थेट लढा देणाऱ्या सर्व कर्मचार्‍यांची रोग प्रतिकारशक्ती अधिक असणं महत्त्वाचे आहे. यासाठी आमच्या लग्नाच्या वाढदिनानिमित्त पोलिसांची प्रतिकारशक्तीची कशी काळजी घेतली याचा विचार आम्ही केला आणि हे च्यवनप्राशचे वाटप करण्याचे ठरवले, असे झालानी यांनी सांगितले.

- Advertisement -

त्यांनी असेही सांगितले की, नेहमी आम्ही लग्नाचा वाढदिवस आमच्या कुटुंबियांसह आणि मित्रांसह पार्टी करून साजरे करतो, परंतु यावेळी परिस्थिती वेगळी असल्याने कठोर कर्तव्य बजावणाऱ्यांना यंदाचा वाढदिवस समर्पित केला आहे. दरम्यान, भारतात कोरोनाव्हायरस मोठ्या प्रमाणात वाढत असून देशात लॉकडाऊन असतानाही, कोरोनाची लागण होणाऱ्या लोकांची संख्या वाढतच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाव्हायरसचे जवळपास 30 हजारांपर्यंत पोहोचले आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाबाधितांची संख्या वाढून 29 हजार 974 झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1594 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 51 लोकांचा मृत्यू झाला आहे.


LockDown: रेल्वे गाड्या ४ मे रोजी सुरू होणार?; उद्या होणाऱ्या बैठकीत निर्णय
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -