कोरोनाच्या संकटात ‘या’ आजारामुळे कुत्र्यांचा सातत्याने मृत्यू!

coronavirus lockdown dozen dogs died in 15 days in azamgarh uttar pradesh
कोरोनाच्या संकटात 'या' आजारामुळे कुत्र्यांचा सातत्याने मृत्यू!

एकीकडे देशात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात पसरत असल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. मात्र याच दरम्यान उत्तर प्रदेशमधील आजमगड जिल्ह्यात कुत्रे सातत्याने मरत असल्यामुळे भीतीच्या वातावरणात पसरले आहे. उत्तर प्रदेशमधील आजमगड जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत १० हून अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. या आजाराममुळे अनेक गावांतील कुत्र्यांचे प्राण गेले आहेत. या घटनेनंतर गावातील परिसरात एकच खळबळ माजली आहे.

जिल्ह्यातील सगडी तहसीलमधील अंजन शहीद, देवपार, सोहराय्या, पातार इत्यादी खेड्यांमध्ये या आजाराने कुत्रे सातत्याने मरत आहेत. गेल्या १५ दिवसात अंजन शहीदमध्येत १० हून अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे.

अंजान शहीद खेड्यातील लोकांचे म्हणणे आहे की, या आजारामुळे ११ कुत्र्यांना आतापर्यंत दफन केले आहे. या आजारामुळे कुत्रे कंबरेतून अपंग होत असून त्याचा नंतर मृत्यू होत आहे. दुसऱ्या खेड्यातील लोकांनी सांगितलं की, या आजारामुळे त्याच्या गावातील दोन ते तीन कुत्र्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाने मुख्य पशुवैद्यकाकडे तपासणी केली आहे. एसडीएमने सांगितलं की, या आजाराचे नाव कॅनाइन डिस्टेम्पर आहे. हा आजार कुत्र्यापासून पसरतो. त्यामुळे आता इतर कुत्र्यांवर उपाचार केले जात आहेत.


हेही वाचा – CoronaVirus: आठ महिन्यांची गर्भवती करतेय कोरोना रुग्णांची सेवा!