घरअर्थजगतजाणून घ्या, २० लाख कोटींमधील कोणाला किती मिळाले?

जाणून घ्या, २० लाख कोटींमधील कोणाला किती मिळाले?

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे २०२० रोजी देशाला संबोधित करताना हे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केलं. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या विशेष आर्थिक पॅकेजशी संबंधित संपूर्ण माहिती देशासमोर ठेवली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सुमारे २० लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजशी संबंधित संपूर्ण माहिती देशासमोर ठेवली आहे. कोविड-१९ चा सामना करण्यासाठी, लॉकडाऊनमुळे पीडित लोक आणि उद्योगांना मदत करण्यासाठी आणि देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने हे पॅकेज जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे २०२० रोजी देशाला संबोधित करताना हे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केलं. हे आर्थिक पॅकेज देशाच्या जीडीपीच्या सुमारे १० टक्के इतकं आहे. अर्थमंत्री बुधवारपासून दररोज पत्रकार परिषदेत पॅकेजचे तपशील सांगत होत्या.

नुकत्याच घोषित पॅकेजपूर्वी केलेले उपाय

१. २२ मार्च २०२० पासून करात सूट मिळाल्यामुळे महसुलात घट – ७,८०० कोटी

- Advertisement -

२. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज (पीएमजीकेपी) – १,70०,००० कोटी

३. पंतप्रधानांनी आरोग्य क्षेत्रासाठी केलेल्या घोषणा – १,७०,००० कोटी

- Advertisement -

सरकारने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजची घोषणा केली. यात पीडीएस कार्डधारकांना मोफत धान्य आणि डाळी देण्याची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर जनधन खातेधारक, गरीब वयोवृद्ध आणि अपंग व्यक्तींना थेट मदत पाठवण्याची घोषणा करण्यात आली.

नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजचा संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे:

पहिल्या दिवसाच्या घोषणा

१. MSME आणि व्यवसायांसाठी आणीबाणीचे कार्यकारी भांडवल – ३,००,००० कोटी

२. संकटाचा सामना करत असलेल्या MSME साठी उप-समन्वय कर्ज – २०,००० कोटी

३. MSME साठी ५०,००० कोटींचा निधी

४. ईपीएफ योगदानाद्वारे व्यवसाय आणि कंत्राटदारांना मदत – २,८०० कोटी

५. ईपीएफ दरात कपात – ६,७५० कोटी

६. एनबीएफसी/एचएफसी / एमएफआयसाठी विशेष तरलता योजना – ३०,००० कोटी

७. एनबीएफसी/एमएफआयच्या उत्तरदायित्वासाठी क्रेडिट गॅरंटी योजना २.० – ४५,००० कोटी

८. सरकार वीज वितरण कंपन्यांमध्ये भांडवल गुंतवणूक करणार – ९०,००० कोटी

९. टीडीएस/टीसीएस दरात कपात – ५०,००० कोटी


हेही वाचा – पेन्शनबाबत बँकेला दिल्या नव्या सूचना, ज्येष्ठांना मिळणार दिलासा


दुसर्‍या दिवसाच्या घोषणा

१. प्रवासी मजुरांना दोन महिन्यांसाठी मोफत धान्य पुरवठा – ३,५०० कोटी

२. मुद्रा शिशु कर्जासाठी व्याज सबवेशन – १,५०० कोटी

३. पथ विक्रेत्यांसाठी विशेष कर्जाची सुविधा – ५,००० कोटी

४. गृहनिर्माण सीएलएसएस-एमआयजी – ७०,००० कोटी

५. नाबार्डमार्फत अतिरिक्त आपत्कालीन कार्यकारी भांडवलाची तरतूद – ३०,००० कोटी

६. केसीसीमार्फत अतिरिक्त कर्जाची सुविधा – २,००,००० कोटी

तिसर्‍या दिवसाच्या घोषणा

१. फूड मायक्रो एंटरप्राइजेज – १०,००० कोटी

२. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना – २०,००० कोटी

३. टॉप टू टोटलः ऑपरेशन ग्रीन – ५०० कोटी

४. अ‍ॅग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड – १,००,००० कोटी

५. पशुपालन संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी – १५,००० कोटी

६. हर्बल कल्चरला प्रोत्साहन देण्यासाठी – ४,००० कोटी

७. मधमाश्या पाळण्यासाठी – ५०० कोटी


हेही वाचा – गरिबांच्या खात्यात १६ हजार ३९४ कोटी जमा – अर्थमंत्री


चौथ्या आणि पाचव्या दिवसाच्या घोषणा

१. व्यवहार्यता अंतर निधी – ८,१०० कोटी

२. मनरेगासाठी अतिरिक्त वाटप – ४०,००० कोटी

या व्यतिरिक्त आरबीआयने केलेल्या उपाययोजनांमुळे एकूण ८,०१,६०३ कोटी रुपयांची रोकड प्रणालीत आली आहे. अशा प्रकारे सरकारचे एकूण मदत पॅकेज २०,९७,०५३ कोटी रुपये आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -