घरCORONA UPDATEVideo : भुकेल्या पोटी त्याने रस्त्यावरचा मेलेला कुत्रा खायला सुरूवात केली!

Video : भुकेल्या पोटी त्याने रस्त्यावरचा मेलेला कुत्रा खायला सुरूवात केली!

Subscribe

हा व्हिडिओ बघून अंगावर नक्कीच काटा येईल.

देशात लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत. हातातलं काम गेल्यामुळे मजुरांनी गावची वाट धरली आहे. अनेक मजूर पायीच आपल्या गावी निघाले आहेत. तर कोणी मिळेल त्या वाहनाने गावी जाताना दिसत आहेत. पण हातात पैसे नसल्यानं राहण्याची आणि खाण्याची आभाळ होत आहे. मजुरांचे काय हाल होत असतील याचे भीषण रूप दाखवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ बघून अंगावर नक्कीच काटा येईल. या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडिओत

या व्हिडीओमध्ये रस्त्यावरील अपघातात मेलेल्या कुत्र्याचं मांस खाताना एक तरुण दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे या तरूणाने रस्त्यात मेलेल्या कुत्र्याचे मांस खायला सुरूवात केली आहे. प्रधुम्न सिंह नरुका नावाच्या तरुणानं हा व्हिडीओ अपलोड केला आहे.

- Advertisement -

जयपूरपासून ४० किलोमीटर अंतरावर दिल्ली-जयपूर-अजमेर बायपासवरील हा व्हिडिओ आहे. प्रधुम्न यांनी या तरुणाची चौकशी केली. या तरुणाला नीट काही सांगता येईना. या तरुणाकडे पाहून तो मनोरुग्ण आहे असं वाटत नव्हतं. पण भुकेमुळे त्याची अवस्था खूप खराब झाल्याचं दिसत होतं. त्यांनी या तरुणाला खायला बाजूला बोलवून खायला दिलं आणि या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणाचा तपास सुरू आहे.


हे ही वाचा – शरीरसंबंध ठेवण्यासाठी त्याने दफन केलेला मुलीचा मृतदेह बाहेर काढला आणि…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -