घरCORONA UPDATEनरेंद्र मोदी देशवासियांसाठी लिहिलेल्या पत्रात कामगारांना उद्देशून म्हणतात....

नरेंद्र मोदी देशवासियांसाठी लिहिलेल्या पत्रात कामगारांना उद्देशून म्हणतात….

Subscribe

करोनाच्या संकटात या सर्वांना अपरिमित यातना सोसाव्या लागल्या असल्याचं मोदींनी पत्रात म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रात दुसऱ्यांदा भाजपची सत्ता आली. मोदी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान झाले. त्याला एक वर्ष पुर्ण होत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधून पत्र लिहिलं आहे. या पत्रात मोदींनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. यावेळी गेल्या एका वर्षातील विकासाबरोबरच स्थलांतरित मजूर, कामगारांचाही उल्लेख केला आहे. करोनाच्या संकटात या सर्वांना अपरिमित यातना सोसाव्या लागल्या असल्याचं मोदींनी पत्रात म्हटलं आहे.

काय आहे पत्रात

देशवासियांना पत्र लिहीताना लिहिले आहे की, “संकटाच्या या काळात कोणालाही त्रास झाला नाही असा दावा करणं चुकीचं ठरेल. श्रमिक मित्र, प्रवासी कामगार बंधू-भगिनी, छोटय़ा-छोटय़ा उद्योगात काम करणारे कारागीर, स्थानकांवर सामान विकणारे, टपरी -हातगाडी लावणारे, दुकानदार , लघू उद्योजक अशा सहकाऱ्यांनी अपरिमित यातना सोसल्या आहेत. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करीत आहोत,”  त्याचबरोबर नरेंद्र मोदींनी आपण ज्या अडचणींना सामोरं जात आहोत त्या मोठ्या संकटात रुपांतरित होऊ नयेत याची काळजी घेणंही महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. लॉकडाउनमुळे हातातील काम गेल्याने हजारोंच्या संख्येने कामगार आपल्या राज्यात परतत आहे. सुरुवातीला कोणतंही साधन नसल्याने कामगार चालत आपल्या घऱी निघाले होते. अनेकांनी हजारो किलोमीटरचा प्रवास चालत पार करुन घर गाठलं. अजूनही अनेक मजूर, कामगार प्रवास करत असून रेल्वेकडून श्रमिक ट्रेन सोडल्या जात आहेत.

- Advertisement -

भारत हीच आपली खरी शक्ती

“देशवासीयांच्या इच्छा- आकांक्षांच्या पूर्ततेसाठी जलदगतीने मार्गक्रमण करत असतानाच कोरोनाने भारतालाही विळखा घातला. एकीकडे अत्याधुनिक आरोग्यसेवा आणि विशाल अर्थव्यवस्था असलेल्या जगातील मोठमोठय़ा महासत्ता आहेत तर दुसरीकडे इतकी प्रचंड लोकसंख्या आणि अनेक आव्हानांनी ग्रासलेला आपला भारत देश आहे. जेव्हा कोरोनाचा संसर्ग वाढेल तेव्हा भारत पूर्ण जगासाठी संकट ठरू शकतो, अशी भीती काही जणांनी व्यक्त केली होती. परंतु भारताकडे बघण्याचा साऱ्या जगाचा दृष्टिकोन बदलला. एक दिवसाची जनता टाळेबंदी असेल किंवा देशव्यापी टाळेबंदी दरम्यान नियमांचे निष्ठेने पालन असेल, या सर्व प्रसंगी भारत हीच आपली खरी शक्ती आहे हे साऱ्यांनी दाखवून दिले”.


हे ही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना खुलं पत्र!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -