घरCORONA UPDATELive Updates: मराठा क्रांती मोर्चाची २० डिसेंबरला राज्यव्यापी बैठक

Live Updates: मराठा क्रांती मोर्चाची २० डिसेंबरला राज्यव्यापी बैठक

Subscribe

नाशिकमध्ये ४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय

नाशिक शहरासह जिल्ह्यातल्या नववी ते बारावीचे वर्ग ४ जानेवारीपासनं सुरू करण्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळांनी आज घेतला.

- Advertisement -

मराठा क्रांती मोर्चाची २० डिसेंबरला राज्यव्यापी बैठक

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षणावर स्थगिती आली. आरक्षणावर स्थगिती आल्यावर मराठा समाजात असंतोषाचा भडका उडाला. परंतु, या असंतोषाची दखल घेण्याची तसदी पण राज्य सरकारने घेतली नाही. या अरकरच्या उदासीन भूमिकेवर विचार करणे आणि पुढील दिशा निश्चित करण्यासाठी मुंबईत या राज्यव्यापी बैठकीचे आयोजन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने केले आहे. ही मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक २० डिसेंबरला होणार आहे.

- Advertisement -

चिपी विमानतळ २६ जानेवारीला सुरु करण्याच्या हालचालींना वेग.


नाराज नेते आणि सोनिया गांधी यांच्यात बैठक सुरु

नाराज २३ नेते आणि सोनिया गांधी यांच्यात बैठक सुरु. गुलाम नबी आझाद, पृथ्वीराज चव्हाण बैठकीला उपस्थित, अशोक गेहलोत आणि कमलनाथ हे देखील बैठकीला उपस्थित आहेत, भुपेंद्र हुड्डा, अंबिका सोनी, मनिष तिवारीही हजर, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि डॉ. मनमोहन सिंगही उपस्थितीत.


फलंदाजांची हाराकिरी; भारताच्या कसोटीतील ‘लोएस्ट’ धावसंख्येची नोंद

कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक सत्र खूप महत्वाचे असते असे म्हटले जाते. हेच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत दिसून आले. भारताने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात आघाडी घेतली होती. तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मात्र फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका भारताला बसला. दुसऱ्या दिवसअखेर १ बाद ९ अशी धावसंख्या असणाऱ्या भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत आटोपला. भारताची ही कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी (लोएस्ट) धावसंख्या ठरली. याआधी १९७४ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचा डाव ४२ धावांत संपुष्टात आला होता.


‘मोहन रावले शिवसेनेतला धगधगता निखारा’

‘शिवसेना नेते, माजी खासदार मोहन रावले यांचे निधन झाल्याचे समजले. त्याचे जाणे धक्कादायक आहे. मोहन म्हणजे ज्यांनी शिवसेनेला जवळून पाहिलेला धगधगता निखारा. रावले हा परळ ब्रँडचा शिवसैनिक होता. त्यांनी पाच वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली. पण, अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहिला. तो तळागळातला शिवसैनिक होता’, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतान दिली आहे.


जळगावात सध्या सोन्याचा भाव ५१,७६३ रुपये प्रति तोळा आहे. तर चांदी ६९,६०७ रुपये प्रति किलो आहे


पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका कोरोनामुक्त

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका कोरोनामुक्त झाला आहे. तालुक्यात ६५६ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी ६३५ रुग्ण कोरोनामुक्त तर २१ जणांचा मृत्यू झाला होता. वेल्हेचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांची कोरोना आढावा बैठकीत माहिती दिली आहे.


अंडी उधार न दिल्याच्या रागातून दुकानदाराची हत्या

अंडी उधार न दिल्याच्या रागातून एका दुकानदाराची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सातारा हादरुन गेला आहे. साताऱ्याच्या बोगदा परिसरात ही घटना घडली असून यामध्ये दुकानदार बबन हणमंत गोखले (४२) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी शुभम कदम आणि सचिन माळवे या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी शाहुपुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नागपुरात कोव्हॅक्सिनच्या चाचणीसाठी स्वंयसेवक पुढे येत नसल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत ८३९ स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिन लस दिली आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची तिसरी चाचणी. चाचणीसाठी ६३१ स्वयंसेवकांची आणखी गरज असल्याचे बोले जात आहे.


देशातील कोरोना संसर्गाचा वेग जरी काहीसा कमी झाल्याचा दिसत असला तरी देखील, अद्यापही करोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. देशभरातातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता १ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात २५ हजार १५३ नवे करोनाबाधित आढळले असून, सध्या देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ कोटी ४५ लाख १३६ वर पोहचलेली आहे.


माजी खासदार मोहन रावले यांचे निधन

शिवसेना नेते, माजी खासदार मोहन रावले यांचे निधन झालं आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृद्यविकाराने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मोहन रावले हे शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील एक शिलेदार म्हणून ओळखले जाणारे सर्वसामान्याचे नेते होते. परळ ब्रँड अशी ओळख असलेल्या मोहन रावले यांचे गोव्यात निधन झाले आहे. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते पाच वेळा लोकसभेवर निवडून आले होते. विशेष म्हणजे मुंबईतील परळ-लालबाग भागातील अत्यंत लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जायचे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -