घरCORONA UPDATEआतापर्यंत ३९ हजाराहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट ३८.७३ टक्के - आरोग्य...

आतापर्यंत ३९ हजाराहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट ३८.७३ टक्के – आरोग्य मंत्रालय

Subscribe

भारतातील रूग्ण बरे होण्याचा दर अमेरिकेपेक्षा २० पट चांगला आहे. भारतात इतर देशांच्या तुलनेत धीम्या गतीने रुग्ण वाढले.

देशात गेल्या २४ तासांत एकूण २,३५० कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण ३९,१७४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. भारताचा रूग्ण बरे होण्याचा दर ३८.७३ टक्के आहे. रूग्ण बरे होण्याचा दर निरंतर सुधारत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. भारतातील रूग्ण बरे होण्याचा दर अमेरिकेपेक्षा २० पट चांगला आहे.

इतर देशांच्या तुलनेत धीम्या गतीने रुग्ण वाढले

देशातील कोरोना विषाणूचे रुग्ण ६४ दिवसांत १०० वरून एक लाखांवर गेली आहेत. अमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशांपेक्षा भारतामध्ये रुग्ण कमी गतीने वाढली आहेत. आरोग्य मंत्रालय आणि वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण २५ दिवसात १०० वरुन ते १ लाख झाली होती. तर स्पेनमध्ये कोरोनाचे रुग्ण एक लाख होण्यास ३० दिवसांचा कालावधी लागला. जर्मनीमध्ये ३५ दिवसांत, इटलीमध्ये ३६, फ्रान्समध्ये ३९ आणि ब्रिटनमध्ये ४२ दिवसात कोरोनाचे रुग्ण १०० वरुन १ लाख झाले.

- Advertisement -

२४ तासांत ४,९७० नवे रुग्ण

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळ ८ वाजल्यापासून गेल्या २४ तासांत कोरोनामुळे १३४ लोकांचा मृत्यू झाला. तर ४,९७० नव्या रुग्णांची नोंद झाली. यासह मंगळवारी देशात मृत्यूचा आकडा ३,१६३ वर पोहोचला. कोरोनाबाधितांचा आकडा १,०१,१३९ वर पोहोचला आहे.


हेही वाचा – आर्थिक पॅकेजचा बार फुसका; देशाची अर्थव्यवस्था ५ टक्क्यांनी घसरणार

- Advertisement -

भारतातील रूग्ण बरे होण्याचा दर अमेरिकेपेक्षा चांगला

भारतातील कोरोना रूग्ण बरे होण्याचा दर अमेरिकेपेक्षा २० पट चांगला आहे. अमेरिकेत, जेव्हा संसर्गाची एकूण प्रकरणे एक लाख होती, तेव्हा केवळ दोन टक्के लोक या आजाराने बरे झाले होते, तर भारतात सुमारे ४० टक्के लोक पूर्णपणे बरे झाले आहेत. जगातील बर्‍याच देशांपेक्षा भारतामध्ये रूग्ण बरे होण्याचा दर खूपच जास्त आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -