Live Update : सरकारने दारुवरील कर कमी केला, शेतकऱ्याला उपेक्षित ठेवले – देवेंद्र फडणवीस

Live Update

भाजपच्या सरकामधील अनेक योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्या

महाविकास आघाडी सरकारने जनाची नाहीतर मनाची लाज बाळगली पाहिजे – देवेंद्र फडणवी

महाविकास आघाडी सरकारने दारुवरील कर कमी केला, शेतकऱ्याला उपेक्षित ठेवले – देवेंद्र फडणवी


शीना बोरा हत्याकांड प्रकरणी जामीन मंजूर

इंद्राणी मुखर्जी साहे सहा वर्षांनंतर जेलबाहेर


पुण्यातील सभेत राज ठाकरे सविस्तर बोलणार- बाळा नांदगावकर

22 मे रोजी राज ठाकरे दौऱ्याबाबत बोलतील

बैठकीत राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेसंदर्भात चर्चा झाली


ज्यांनी आमचे नगरसेवक चोरले त्यांच्याकडून काय मदत घेणार? संदीप देशपांडेंचा राऊतांवर हल्लाबोल

दौऱ्याबाबत राज ठाकरे पुण्यातील सभेत बोलतील- संदीप देशपांडे


सायन – पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी

वाशी खाडी पुलावर डंपरचा अपघात

अपघातात डंपर चालक जखमी


राज ठाकरेंना आम्ही सहकार्य केलं असतं, आम्हाला राजकारण करायचं नाही – संजय राऊत

आदित्य ठाकरे 15 जूनला अयोध्या दौऱ्यावर, दौऱ्यादरम्यान इस्कॉन मंदिराला भेट देणार – संजय राऊत

राज्य सभेची सहावी जागा शिवसेना लढेल- संजय राऊत


संदीप देशपांडे अटकपूर्व जामिनानंतर पहिल्यांदाच शिवतीर्थावर दाखल


जम्मू -श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला, बचावकार्य सुरु

जम्मू – श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील निर्माणाधीन चार लेन बोगद्याचा काही भाग कोसळल्याने नऊ जण अडकले होते, त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले आहे. तर उर्वरित सात जणांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली.


रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून मान्सून पावसाच्या सरी

रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळून लागल्या आहेत.

दरम्यान पुढील दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

रायगडमध्येही काल दिवसभर ढगाळ वातावरणास पावसाच्या सरी कोसळत आहेत. पोलादपूर, महाड, माणगाव परिसरतही हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत.


ज्ञानवापी मशिदीबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

ज्ञानवापी मशिदीबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी, वाराणसी कोर्टाला सुनावणी न करण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश