घरताज्या घडामोडीLive Update: म्युकरमायकोसिसवरील खासगी उपचारांचे खर्च नियंत्रित करण्याबाबतच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी दिली मंजूरी

Live Update: म्युकरमायकोसिसवरील खासगी उपचारांचे खर्च नियंत्रित करण्याबाबतच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी दिली मंजूरी

Subscribe

म्युकरमायकोसीस वरील खासगी उपचारांचे खर्च नियंत्रित करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावास मंजुरी दिली असून नोटिफिकेशन प्रसिध्द करण्यात आले आहे. या रोगावरील शहरी आणि ग्रामीण भागात उपचाराचे निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारता येणार नाही


दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मित्र सिद्धार्थ पिठानीला ड्रग्ज प्रकरणात १४ दिवसांच्या न्यायालयातीन कोठडीत रवानगी.

- Advertisement -


अनलॉकच्या नव्या गाईडलाईन संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. मुख्यमंत्री त्यावर विचार करतील आणि दुपारपर्यंत अधिकसूचना निघेल, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्यामुळे दुपारपर्यंत अनलॉक संदर्भात निर्माण झालेल्या गोंधळ दूर होईल, अशी आशा आहे.

- Advertisement -

मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया डोमिनिकाच्या कायद्यामध्ये अडकली आहे. त्याममुळे भारताकडे मेहुल चोक्सीचे प्रत्यार्पण लांबणीवर पडण्याची चिन्हं आहे. चोक्सीला आणायला गेलेले विमान आणि सुरक्षा यंत्रणा भारतात परतल्या आहेत.


गुरुवारी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील अनलॉक संदर्भात घोषणा केली आणि त्यानंतर माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आलेला खुलासा यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणूनच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा संभ्रम दूर करणार असल्याचे म्हटले जात आहे.


१८-४४ वयोगटातील नागरिकांसाठी सूचना महापालिकेने दिल्या आहेत. कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतलेले व्यक्ती (१८-४४), येत्या आठवड्यात सोम, मंगळ, व बुधवारी, कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस लसीकरण केंद्रांवर थेट जाऊन घेऊ शकतात. तसेच गुरू व शुक्रवारी ऑनलाईन वेळ नोंदणी करून लस घेऊ शकतात


जगातील कोरोनाबाधितांची संख्या अजूनही वाढत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात आतापर्यंत १७ कोटी २८ लाख ८८ हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ३७ लाख १६ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १५ कोटी ५५ लाख ९९ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यात मंगळवारी १४ हजार १२३ आणि बुधवारी १५ हजार १६९ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. गुरुवारी हा आकडा आणखी काहीसा वाढला. गुरुवारी १५ हजार २२९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५७ लाख ९१ हजार ४१३ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ०४ हजार ९७४ वर पोहोचली आहे. सविस्तर वाचा 


मुंबईतील रुग्णसंख्येत गेल्या अनेक दिवासांपासून चढ उतार होताना दिसत आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब ठरु शकते. मुंबईची रुग्णसंख्या गेल्या आठवडाभरापासून १ हजारांच्या आत नोंदवण्यात येत असली तरीही मुंबईत बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठा चढ उतार पहायाला मिळत आहे. कालही मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बाधितांची संख्या अधिक आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -