नागरिकांनो तुमची काळजी घ्या! राज्यात डेल्टा प्लसचे ७ रुग्ण

Delta Plus Varriant: covid-19 delta plus variant know syptoms and ways of prevention

कोरोना विषाणुची दुसरी लाट ओसरत असतानाच देशात आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्णसंख्या ही ६० हजारपेक्षा कमी झाली आहे. मात्र कोरोनाच्या नवनव्या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. यात कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटने राज्यातील आरोग्य यंत्रणेसमोर नवे संकट उभे केले आहे. रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघरमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचे नवे सात रुग्ण आढळून आहेत. त्यामुळे नागरिकांना आता अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. डेल्टा या व्हेरियंटच्या म्युटेशनमधून डेल्टा प्लस व्हेरियंट तयार झाला आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने जोखीम अधिक वाढली आहे,

यात देशात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आल्यास त्यासाठी डेल्टा प्लस व्हेरियंट कारणीभूत असेल असे मत आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ८ ते १० लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता असून याचा १० टक्के लहान मुलांवर परिणाम होईल असा इशाराही आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनाचा हा व्हेरियंट रोगप्रतिकारशक्तीला चकवा देत असल्याने उपचार करताना अनेक अडचणी येत आहेत.

नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरीत डेल्टा प्लसचे काही रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांतील काहींचे नमुने चाचणीसाठी पाठवले आहेत. त्यांचे अंतिम अहवाल लकरचं मिळतील अशी माहिती डीएमईआरचे संचालक डॉ. लहाने यांनी दिली आहे. डेल्टा प्लसचे ५ रुग्ण रत्नागिरीत आढळून आला असून प्रत्येकी एक एक रुग्ण नवी मुंबई, पालघरमध्ये आढळला आहे.
राज्यात गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र कोल्हापूर, सातारा, सांगली, कोकण पट्ट्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे.


कोरोनाबाधित मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची नुकसान भरपाई देणे अशक्य, केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दिले स्पष्टीकरण