घरदेश-विदेशLive Update: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा संपला

Live Update: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा संपला

Subscribe

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा संपला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर १४ मार्च रोजी दुसरा टप्पा सुरू आहे.

- Advertisement -

गुजरातमध्ये गेल्या २४ तासांत १ हजार ८८३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून १४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ५ हजार ५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या गुजरातमध्ये १८ हजार ३०१ सक्रीय रुग्ण आहेत.

- Advertisement -

भाजपच्या १२ आमदाराचं निलंबन मागे, राज्य सरकारचा निर्णय


मुंबईत गेल्या २४ तासांत ३६७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून एकाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ८४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ३ हजार २१९ सक्रीय रुग्ण आहेत.


गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार ४५५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७८ लाख ३५ हजार ८८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४३ हजार ३५५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ६० हजार ९०२ सक्रीय रुग्ण आहेत.


भाजप नेते किरीट सोमय्यांचा सत्कार पुणे मनपाच्या पायऱ्यांवर केल्यानंतर काँग्रेसकडून गोमूत्र टाकून पायऱ्या स्वच्छ करण्यात आल्या.


किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरणी 2 पोलीसांचे निलंबन

सोमय्यांच्या सत्कारासाठी पालिकेने परवानगी नाकारली


आदित्य ठाकरे गोव्यात दाखल

प्रचारासाठी आलोय, गोवा जिंकुया- आदित्य ठाकरे


बच्चू कडू यांना २ महिने सश्रम कारावास

२०१४ च्या निवडणुकीत मुंबईतील प्लॅटची माहिती लपवल्याचा आरोप


महामंडळ वाटपाबाबत वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक

बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित


18 फेब्रुवारीपर्यंत विलीनीकरणाचा अहवाल सादर करा, हायकोर्टाचे राज्य


भष्ट्राचाराची प्रकरणं उघड होत असल्याने राऊतांची आदळआपट- आशिष शेलार

मविआचा एकही नेता राऊतांच्या बाजूने नाही- आशिष शेलार


काँग्रेस नेते राहुल गांधी गोव्यात दाखल


महाराष्ट्र देशाच्या आर्थिक आणि संस्कृती क्षेत्राचे केंद्र -राष्ट्रपती रामनाथ कोविंद

महाराष्ट्र आध्यात्माची आणि वीरतापूर्ण संघर्षाची भूमी- राष्ट्रपती रामनाथ कोविंद


राजभवनात ऐतिहासिक बंकर आहे. या बंकरमधून महाराष्ट्रातील क्रांतीकारांची छायाचित्रांच्या माध्यमातून माहिती देणार. यामुळे आगामी पिढ्यांना प्रेरणा मिळेल. लवकरच या कामाला सुरुवात करणार- राज्यपाल भगत सिंग कोश्यारी


कोरोना काळात चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला- राज्यपाल कोश्यारी


 राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन, राजकीय हवा कशीही असली तरी इथली हवा शांत : उद्धव ठाकरे

राजभवन हा पन्नास एकरचा परिसर, समुद्र किनारा, झाडी आहे.

राजकीय हवा कशी असले तरी इथली हवा थंड आहे, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांन टोला

पावसाळ्यात इथं मोर नाचतानाचे फोटो येतात, तर, कधी विषारी साप पकडल्याचे फोटो येतात.  शिवसेना प्रमुखांसोबत येथे यायचो, अशा अनेक आठवणींना मुख्यमंत्र्यांनी दिला उजाळा,

जुना वारसा जपून आपण आधुनिककतेकडे चाललो आहोत- मुख्यमंत्री


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवनातील दरबार हॉलचे उद्धाटन

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार उद्धाटन कार्यक्रमाला उपस्थित

याशिवाय मंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, चंद्रकांत पाटील यांचीही कार्यक्रमाला हजेरी


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजभवनात दाखल


निवडणुकीतील युतीचा निर्णय उच्च स्थरावर होईल- उपमुख्यमंत्री अजित पवार


मालेगावात आज हिजाब डेला परवानगी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त


मंत्री आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आज मुंबईतील विकास कामांची एकत्र पाहणी


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राजभवनातील दरबार हॉलचे उद्धाटन


क्वाड विदेश मंत्र्यांची आज बैठक


उत्तरप्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीपर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची रॅली


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राजभवनातील दरबार सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्याला राहणार उपस्थित
सकाळी ११ वाजता हा सोहळा होणार आहे.


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे गोवा दौऱ्यावर


भाजपा नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर

भाजपा नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवरचं त्यांचा सत्कार केला जाणार आहे.


अमित ठाकरेंचा 11 फेब्रुवारीला रायगड दौरा


मनी लाँड्रिंगप्रकरणी राणा अय्युब यांची 1.77 कोटी रुपये जप्त
बेकायदेशीरपणे जनतेचा पैसा कमावल्याचा आरोप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -