Live Update: दिल्ली गेल्या २४ तासांत १,१०४ नव्या रुग्णांची वाढ, १२ जणांचा मृत्यू

maharashtra politics BMC Budget 2023 Anganewadi Jatra satyajeet tambe nirmala sitharaman cm eknath shinde devendra fadanvis

दिल्लीत आज दिवसभरात १ हजार १०४ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून १२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १ हजार ९५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या दिल्लीत ५ हजार ४३८ रुग्ण सक्रीय आहेत.


मुंबई गेल्या २४ तासांत ४२९ नवे कोरोनाबाधित आढळले असून २ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. तर ८२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ३ हजार ६९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


देशात आतापर्यंत १७२ कोटी कोरोना लसीकरण झाले आहे. आज दिवसभरात ४३ लाख लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.


स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी ठिकाणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थितीत


विद्यार्थ्यांनी धार्मिक पोशाख टाळावा, असा आदेश कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने दिला आहे.


हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा


राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई विमानतळावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारीसह आदित्य ठाकरे त्यांच्या स्वागतासाठी दाखल झाले होते.


  • जनतेला कुठेही त्रास होऊ नये म्हणून स्वत: शरण आलो – नितेश राणे
  • तपासकार्यात अडथळा आणला नाही – नितेश राणे
  • नितेश राणे कोल्हापुरातून सावंतवाडीमध्ये दाखल झाले आहेत.

गोवा आमच्यासाठी परराज्य नाही, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील पत्रकार परिषदेत केले.


पुण्यात रिक्षावाला संघटनेचे ‘रास्ता रोको’ आंदोलन ; रेल्वेस्थानक परिसरातील वाहतूक विस्कळीत


लखीमपुर खीरी प्रकरणी केंद्रीय मंत्री आशिष मिश्राला जामीन मंजूर


महाराष्ट्र हादरुन गेलेल्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला सायंकाळी 5 वाजता शिक्षा सुनावणार


आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करणाऱ्यांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. विमान प्रवासाबाबत कोरोनासंदर्भातील काही नियमांमध्ये शिथिलता करण्यात येत आहे. 7 दिवसांच्या होम क्वारंटाईनचे नियम रद्द करण्यात आले आहेत.


मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शिवतीर्थ’वरील मनसेची बैठक संपली.


किरीट सोमय्यांवरील हल्ला हा जाणीपूर्वक कट रचून करण्यात आला होता – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील


सुडबुद्धीच्या राजकारणात मला अडकवण्याचा ठाकरे सरकार प्रयत्न करत असल्याचे गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी केले आहेत. अमरावतीत मनपा आयुक्तांवर शाहीफेक करत त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी रवी राणांसह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नागपुरातील नितीन गडकरींच्या घरासमोर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. कॉंग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला होता.नितीन गडकरींच्या घरासमोर कॉंग्रेसच्याआधी भाजपाचे कार्यकर्ते दाखल झाले आहेत. नितीन गडकरींच्या घरासमोर भाजप-कॉंग्रेस आमनेसामने आले असून, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरु आहे.


ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर ; यंदाचा 3540 कोटींचा अर्थसंकल्प जाहीर


महाराष्ट्रातही हिजाबवरून सुरू असलेल्या गदारोळाचे वातावरण पाहता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी “राजकीय फायद्यासाठी अशाप्रकारची आंदोलने किंवा राजकीय फायद्यासाठी अशाप्रकारच्या गोष्टी करणं उचित नाही. यामुळे सर्वांनी राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करा,” असे आवाहन केले आहे.


कर्नाटकातील हिजाबबंदी प्रकरणाचे महाराष्ट्रातही पडसाद उमटत आहेत. हिजाबबंदी प्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीचं जोरदार आंदोलन सुरु आहे.


रेल्वेच्या नव्या नियमावलीचा निषेध करत सीएसएमटी स्थानकात बुट पोलिश करणाऱ्यांचे जोरदार आंदोलन


8 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू झालेली भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक आज संपली आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी धोरणात्मक दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल केलेला नसून, रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहेत.


नितेश राणेंना आज कोल्हापुरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज


किरीट सोमय्या दिल्लीत दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार असून, पुण्यातील धक्काबुक्की प्रकरणी माहिती देणार आहेत.


  • सरकार पाडण्याच्या धमक्या द्या ; मात्र शिवसेना आणि महाराष्ट्र हा कुणासमोरही झुकणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिला.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा भाजपाला अधिकार नाही – संजय राऊत

मुंबईचे माजी महापौर श्री. आर.आर. सिंह यांचे आज पहाटे अडीच वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले.


राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते मुंबई तसेच रत्नागिरी या दोन ठिकाणी वास्तूंचे उद्घाटन होणार आहेत. त्यासाठी 11 फेब्रुवारी रोजी मुंबई आणि 12 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी असा त्यांचा नियोजित दौरा आहे.


अमरावतीत मनपा आयुक्तांवर शाहीफेक ; हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी रवी राणांसह 11 जणांवर गुन्हा दाखल


लता दीदींच्या अस्थींचं आज नाशकात विसर्जन

गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या अस्थींचे आज रामकुंडात विसर्जन

विदर्भातील काही जिल्ह्यांत वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता


मनसेची आज महत्त्वपूर्ण बैठक


लता मंगेशकर अध्यायन केंद्राला कुटुंबियांचा विरोध


मंगेशकर कुटुंबियांना विश्वासात न घेतल्याने आक्षेप


अमोल पालेकरांची प्रकृती खालावली


प्रवीण राऊतांच्या ईडी कोठडीत वाढ


आरोपी रियाज भाटीची हायकोर्टात धाव


कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणी पवारांना समन्स