घरCORONA UPDATECoronaVirus: दिल्लीतील सरकारी डॉक्टरला कोरोनाची लागण!

CoronaVirus: दिल्लीतील सरकारी डॉक्टरला कोरोनाची लागण!

Subscribe

दिल्लीतील सरकारी डॉक्टरचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. त्यामुळे हे सरकारी हॉस्पिटल बंद ठेवण्यात आले आहे.

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालत आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. राजधानी दिल्लीत अजून सरकारी डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. हा डॉक्टर दिल्लीतील सरकार हॉस्पिटलमध्ये कार्यरत होता. डॉक्टरचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर आता हे सरकारी हॉस्पिटल बंद करण्यात आले आहे. दिल्ली गेल्या २४ तासात कोरोनाचे २३ नवे रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी दिल्लीतील कोरोनाग्रस्तांची संख्या १२०वर झाली होती. आतापर्यंत दिल्लीत कोरोना एकच नवा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या १२० वरून १२१वर पोहोचली आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार १२१ कोरोनाच्या रुग्णांपैकी २४ रुग्ण हे निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले व्यक्ती आहेत. आतापर्यंत पाच जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

आज जो डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तो दिल्लीतील सरकारी दिल्ली स्टेट कॅन्सर इंस्टीट्यूटमध्ये कार्यरत आहे. या हॉस्पिटल किंवा डॉक्टरचा कोरोनाशी कोणताही संबंध नव्हता. त्यामुळे आता हॉस्पिटलमधील कार्यलये, ओपीडी आणि प्रयोगशाळा सॅनिटाईज केली जात आहे. या डॉक्टरच्या संपर्का आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन केलं जात आहे. हॉस्पिटलचे संचालक बी.एल.शेरवाल यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, या डॉक्टरचे भाऊ आणि वहिणी इंग्लंडहून आले होते. त्यामुळे या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे.


हेही वाचा – CoronaVirus: फ्रान्समध्ये एकाच दिवशी ४९९ जणांचा मृत्यू!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -