Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Coronavirus Outbreak In India: भारतात कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी पार!

Coronavirus Outbreak In India: भारतात कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी पार!

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात आता कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी पार झाली आहे. आज २४ तासांत ३ लाख ५७ हजार २२९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ३ हजार ४४९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ लाख २० हजार २८९ बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता भारतातील कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी २ लाख ८२ हजार ८३३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख २२ हजार ४०८ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी ६६ लाख १३ हजार २९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३४ हजार ४७ हजार १३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १५ कोटी ८९ लाख ३२ हजार ९२१ लसीकरण पार पडले आहे.

जगातील कोरोनाबाधितांच्या यादीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून ३ कोटी ३२ लाख ३० हजार ९९२ कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ५ लाख ९१ हजार ५१४ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ५९ लाख ८ हजार ६८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

‘या’ ५ राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण

- Advertisement -

१. महाराष्ट्र – एकूण कोरोनाबाधित संख्या – ४७,७१,०२२, मृत्यूची संख्या – ७०,८५१
२. केरळ – एकूण कोरोनाबाधित संख्या – १६,६४,७९०, मृत्यूची संख्या -५,४५१
३. कर्नाटक – एकूण कोरोनाबाधित संख्या -१६,४६,३०३, मृत्यूची संख्या – १६,२५०
४. उत्तर प्रदेश – एकूण कोरोनाबाधित संख्या -१३,४२,४१३, मृत्यूची संख्या – १३,४४७
५. तामिळनाडू – एकूण कोरोनाबाधित संख्या -१२,२८,०६४, मृत्यूची संख्या – १४,४६८


हेही वाचा – Lockdown in India: देशात पुन्हा होणार लॉकडाऊन? टास्क फोर्सकडून केंद्राला शिफारस


- Advertisement -

 

- Advertisement -