घरदेश-विदेशCorona संक्रमित देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर

Corona संक्रमित देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर

Subscribe

भारतामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. राज्यात गुरुवारी ८,७०२ कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे १२६ दिवसांमध्ये बुधवारी पहिल्यांदाच मोठ्याप्रमाणात रुग्ण आढळले. गेल्या २४ तासांत ८ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहे.
केंद्रीय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरात गेल्या २४ तासात कोरोनाचे १६ हजार ५७७ नव्या केस समोर आल्या आहेत. यादरम्यान १२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात आता कोरोनाबाधितांची आकडेवारी १ कोटी १० लाख ६३ हजार ४९१ वर पोहचली आहे. यातील १ कोटी ७ लाख ५० हजार ६८० रुग्ण बरे झाले आहेत. तर १ लाख ५५ हजार ९८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर मृत्यूंचा आकडा १ लाख ५६ हजार ८२५ वर पोहचला आहे.

त्यामुळे कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. एक आठवड्यापूर्वी भारत कोरोना रुग्ण संख्येतून टॉप १० देशांच्या यादीतून बाहेर होता. मात्र दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने आता भारत पुन्हा चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. देशात दररोज १३ हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. जगातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर यात अमेरिका पहिल्या स्थानकावर आहे. अमेरिकेत दररोज ७० हजारहून अधिक केस समोर येत आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ब्राझीलचा नंबर लागतो. ब्राझीलमध्ये ६० हजार रुग्ण कोरोनाबाधित आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर फ्रान्स असून फ्रान्समध्ये सध्या २० हून अधिक रुग्ण रोज आढळत आहेत. भारतात सध्या कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. यापाठोपाठच केरळ, गुजरात, दिल्लीसारख्या राज्यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे देशात कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी पुन्हा रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो अशा चर्चा रंगत आहे.

- Advertisement -

हेही वाचा- मुकेश अंबानीच्या घराबाहेर स्फोटके : गृहमंत्री, मुंबई पोलिसांची पहिली प्रतिक्रिया

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -