Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग Covid-19 बाधितांच्या आकडेवारीत जगभरात 'या' देशांचा 'Top 4' मध्ये समावेश

Covid-19 बाधितांच्या आकडेवारीत जगभरात ‘या’ देशांचा ‘Top 4’ मध्ये समावेश

Related Story

- Advertisement -

जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाची लागण होणाऱ्यांचा आकडा वाढता असल्याने जगाच्या चिंतेत पुन्हा एकदा भर पडली आहे. अमेरिका, रशिया, भारतासह ब्राझीलमध्ये दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती अत्यंत वाईट होत चालली आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 30,917,142 वर पोहोचला आहे तर सध्या 7,006,619 सक्रिय रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे अमेरिकेत आतापर्यंत 23,348,510 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अमेरिका जगातील पहिल्या क्रमांकावरील संक्रमित देश आहे. तर ब्राझील दूसरा आणि भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

यासोबतच ब्राझील मध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 8,318 रुग्ण आढळल्याने सध्या बाधितांचा आकडा 12,490,362 इतका झाला आहे. तर 310,694 लोकांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला. सलग दुसर्‍या दिवशी येथे 3000 हून अधिक लोक मरण पावल्याने ब्राझीलमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची दहशत पसरू लागली आहे. यापूर्वी शनिवारी कोरोनामुळे 3600 लोकांचा कोरोनाने बळी गेला.

तसेत तिसऱ्या स्थानी असलेल्या भारत देशात देखील कोरोना बाधितांच्या आकडेवारीचा आलेख वाढता आहे. भारतात गेल्या 24 तासात 62 हजार 714 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा एकूण आकडा 1,19,71,624 झाला आहे. तर गेल्या दिवसभरात 312 जणांनी आपला जीव कोरोनामुळे गमवल्याने चिंता वाढली आहे. दिलासादायक म्हणजे आतापर्यंत 1,13,23762 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत 1,13,23762 लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे. रशिया कोरोनाबाधितांच्या यादीत चौथ्या स्थानावर असून आतापर्यंत 4,519,832 कोरोना बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 97,740 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -