घरCORONA UPDATEबघा असा दिसतो 'करोना' विषाणू; भारतीय शास्त्रज्ञांनी लावला शोध

बघा असा दिसतो ‘करोना’ विषाणू; भारतीय शास्त्रज्ञांनी लावला शोध

Subscribe

करोना विषाणूचा शोध लागला असून या विषाणूचे फोटो देखील आले आहेत.

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसने अनेक देशात हाहाकार केला आहे. दिवसेंदिवस या विषाणूंची संख्या वाढताना दिसत आहे. सध्या या करोना व्हारसविरोधात लस शोधण्याचे अनेक देशातून प्रयत्न सुरु आहेत. पण, हा करोना व्हायरस नेमका दिसतो तरी कसा? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. मात्र, याचा शोध भारतीय शास्त्रज्ञाने लावला असून त्याचे फोटो देखील समोर आले आहेत.

- Advertisement -

असा दिसतो करोना व्हायरस

भारतीय शास्त्रज्ञांनी मायक्रोस्पद्वारे करोना व्हायरसला टिपले आहे. SARS-CoV-2 virus (COVID19) हा करोना व्हायरस नेमका कसा दिसतो ते फोटोतून समोर आले आहे. केरळमध्ये ३० जानेवारीला करोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर या रुग्णाच्या घशातील लाळेचे नमुने शास्त्रज्ञांनी संशोधनासाठी घेतले. त्यानंतर तपासणीत हा करोनाचा विषाणू असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. नंतर शास्त्रज्ञांनी हा व्हायरस १० एनएमचा असल्याचे स्पष्ट केले. इंडियन जरनल ऑफ मायक्रोबायोलॉजी रिसर्चच्या (IJMR) अंकात ही माहिती देण्यात आली आहे.


हेही वाचा – पत्नीच्या प्रेमापोटी घोड्यावरुन गाठले सोलापूर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -