घरCORONA UPDATEहस्तमैथुनामुळे कोरोनाचा फैलाव होत नाही; न्यू यॉर्क सरकारचा सल्ला

हस्तमैथुनामुळे कोरोनाचा फैलाव होत नाही; न्यू यॉर्क सरकारचा सल्ला

Subscribe

हस्तमैथुनामुळे कोरोनाचा फैलाव होत नाही, असा अजब सल्ला न्यू यॉर्क सरकारने नागरिकांना दिला आहे.

जगभरात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. तसेच या कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता बहुतांश देशांमध्ये लॉकडाउन करण्यात आले आहे. तसेच अनेक कंपन्या, कार्यालये बंद असल्यामुळे सर्वजणांनी वर्कफ्रॉम होमचा पर्याय निवडला आहे. तर अनेक जणांचे घरुन काम शक्य नसल्यामुळे त्यांना सुट्टी मिळाली आहे. परंतु, या वेळेत काय करायाचे, असा अनेकांना प्रश्न पडला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन पत्ते खेळणे, मोबाईल वरील गाणी ऐकणे, खेळणे यामध्ये स्वत:चा वेळ घालवत आहेत. मात्र, अमेरिकेतील न्यू यॉर्क सरकारने वेगळा उपाय शोधून काढला आहे.

हस्तमैथुन करण्याचा सल्ला

लैंगिक आरोग्याचा अभ्यास करणाऱ्या एका स्टडीने तणाव कमी करण्यासाठी एक उपाय सुचवला आहे. यामध्ये सांगितले आहे की, ‘चुंबनामुळे COVID -19 चा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे तुम्हीच तुमचे सुरक्षित सेक्स पार्टनर आहात. तसेच साबणाने सेक्स टॉइज आणि हात स्वच्छ धुवत असाल तर, हस्तमैथुनामुळे COVID -19 चा फैलाव होणार नाही’, असे न्यूयॉर्कच्या आरोग्य खात्याने अधिकृत टि्वटर अकाउंटवर म्हटले आहे.

- Advertisement -

हस्तमैथुनामुळे मानसिक आणि शारिरिक फायदा होत असल्याचे आतापर्यंत वेगवेगळ्या लैंगिक अभ्यास अहवालातून समोर आले आहे. तसेच हस्तमैथुनामुळे तणाव देखील कमी होतो आणि चांगली झोप देखील लागते, असे देखील लैंगिक अभ्यास अहवालातून समोर आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जगभरात कोरोनाची सद्यस्थिती : ७ लाख कोरोनाबाधित तर बळींची संख्या घाबरवणारी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -