घरCORONA UPDATEपर्यटकांसाठी खुशखबर! ७ जुलैपासून पर्यटकांना दुबईला जाता येणार

पर्यटकांसाठी खुशखबर! ७ जुलैपासून पर्यटकांना दुबईला जाता येणार

Subscribe

दुबईच्या यात्रेदरम्यान ९६ तास आधी कोरोना विषाणूची तपासणी करणे देखील बंधनकारक

जगभरातील कोरोना संकटात परदेशी पर्यटक ७ जुलैपासून दुबईला जाऊ शकतील. दुबईने याला परवानगी दिली आहे. त्याचबरोबर रेसिडेन्सी व्हिसा असणारे परदेशी नागरिक २२ जूनपासून दुबईला परत येऊ शकतील.

कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर दुबईने पर्यटकांना येण्यास मनाई केली होती. परंतु आता जेव्हा जगभरात नियम आणि कायदे शिथिल केले जात आहेत. त्यावेळी दुबई पुन्हा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. प्रवाशांसाठी सरकारने एक प्रोटोकॉल यादीही जाहीर केली आहे, जी सर्वांसाठी अनिवार्य असेल.

- Advertisement -

यात्रेदरम्यान ९६ तास आधी तपासणी बंधनकारक 

दुबई माध्यमांच्या वृत्तानुसार, सरकारने या महामारीला ध्यानात ठेवून जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच, पर्यटकांना त्यांचे कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकेट सादर करावे लागेल किंवा दुबई विमानतळावर चाचणी करून घ्यावी लागेल. ज्यांनी रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील, त्यांना १४ दिवस आयसोलेशनमध्ये ठेवले जाईल. दुबईच्या यात्रेदरम्यान ९६ तास आधी कोरोना विषाणूची तपासणी करणे देखील बंधनकारक केले आहे.

स्थानिकांना २३ जूनपासून परदेशात जाता येणार

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, दुबई प्रशासनाने असे म्हटले आहे की, पर्यटकांकडे आंतरराष्ट्रीय आरोग्य विमा असला पाहिजे तसेच, त्यांनी सर्व माहिती असलेले मोबाईल अ‍ॅप्लिकेशनही डाऊनलोड केले पाहिजे. याव्यतिरिक्त, त्यांना आरोग्याशी संबंधित फॉर्म देखील भरावा लागेल. रविवारी केलेल्या या घोषणेत असेही म्हटले आहे की, स्थानिक रहिवासी मंगळवार, २३ जूनपासून परदेशात जाऊ शकतील.


लाँच होताच ‘हे’ Made in India अ‍ॅप ५ लाख युजर्सने केले डाऊनलोड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -